Mycoplasma Genitalium a sexually transmitted disease, know about this | 'या' आजारामुळे लैंगिक जीवन येऊ शकतं धोक्यात!
'या' आजारामुळे लैंगिक जीवन येऊ शकतं धोक्यात!

वेगवेगळ्या लैंगिक आजारांबाबत लोकांना फारच कमी माहिती असते. असाच एका लैंगिक आजार म्हणजे मायकोप्लाज्मा जेनिटेलियम (Mycoplasma Genitalium). हा एक संसर्गजन्य लैंगिक आजार आहे. वेळीच यावर काही उपाय केले गेले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जगभरातील डॉक्टर या आजाराबाबत सतर्क राहण्याचा इशारा देत आहेत. Mycoplasma Genitalium या आजाराचे सुरुवातीची काहीही लक्षणे बघायला मिळत नाही. पण पुरूष आणि महिला दोघांच्याही प्रायव्हेट पार्टमध्ये संक्रमण होऊ शकतं. हे संक्रमण इतकं घातक आहे की, यामुळे महिलांना इन्फर्टिलिटीचा सामना करावा लागतो.

Mycoplasma Genitalium आजाराची सर्वात मोठी समस्या म्हणजे या आजाराची सुरूवातीची काहीही लक्षणे आढळून येत नाहीत. त्यासोबतच याच्या उपचारात मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. अनेकदा तर यावर अ‍ॅंटी-बायोटिकचा प्रभाव होणंही बंद होतं.
काय आहे मायकोप्लाज्मा जेनिटेलियम ?

या आजाराचं मुख्य कारण इकोप्लाज्मा जेनमिटेलियम नावाचा एक बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाचं संक्रमण झालं तर प्रायव्हेट पार्टमध्ये सूज येते आणि स्त्राव होतो. यामुळे लघवी करतानाही वेदना होतात. तसेच महिलांना गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबपर्यंत इंन्फेक्शनही होतं. इन्फेक्शनमुळे वेदना आणि रक्तस्त्रावाचीही समस्या होऊ लागते.

कसा पसरतो हा आजार?

हा आजार मुख्यत: असुरक्षित शारीरिक संबंधामुळे होतो. एकापेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने याची लागण होण्याचा धोका असतो. अशात कंडोमचा वापर करून या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.


Web Title: Mycoplasma Genitalium a sexually transmitted disease, know about this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.