Leave these worries for healthy sex life | लैंगिक जीवन : 'हे' गैरसमज ठरतात तुमच्या परमोच्च आनंदाच्या मार्गातील अडथळा!
लैंगिक जीवन : 'हे' गैरसमज ठरतात तुमच्या परमोच्च आनंदाच्या मार्गातील अडथळा!

लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आज अनेक लोक लैगिक जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या गैरसमजांवर विश्वास ठेवतात. यात जास्त प्रमाण हे पुरूषांचं असतं. त्यांच्यात लैंगिक जीवनाबद्दलच नाही तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टबाबतही अनेक भ्रम असतात. चला जाणून घेऊ अशाच काही गैरसमजाबाबत ज्याने अनेकांचं लैंगिक जीवन धोक्यात आलं आहे. लैंगिक जीवनाबाबतचे असेच काही गैरसमज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याने अनेकांचं नुकसान होतंय.

प्रायव्हेट पार्टची साइज

याबाबत तर पॉर्न सिनेमे पाहून पाहून अनेकांमध्ये कितीतरी गैरसमज असतात. मात्र, प्रत्यक्षात आनंदी लैंगिक जीवनासाठी प्रायव्हेटच्या साइजचा काहीच संबंध नसतो. सामान्यपणे महिलांच्या प्रायव्हेट पार्टच्या वरील दोन इंचाच्या भागातच उत्तेजना आणि संवेदना होते. आतील भाग हा उत्तेजनाहिन असतो.

पार्टनरची संतुष्टी

पार्टनरची संतुष्टी केवळ प्रायव्हेट पार्टच्या साइजवरच नाही तर तुम्हाला दोघांच्या नात्यावरही अवलंबून असते. महिलांना जर वेदना किंवा आनंदाचा अनुभव होतो तो केवळ सुरूवातीच्या २ इंचाच्या भागात होतो. त्यामुळे पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टची साइज महत्वाची ठरत नाही. तसेच याचा तुमच्या पार्टनरच्या संतुष्टीशी काहीही संबंध नाही.

प्रेग्नन्सीमध्ये अडचण

एक गैरसमज असाही आहे की, जर प्रायव्हेट पार्टचा आकार लहान असेल तर प्रेग्नन्सीमध्ये समस्या होते. पण इथे समजून घेण्याची गरज आहे की, पुरूषांच्या शरीरातून वीर्य बाहेर निघतं ते योनी मार्गातूनच गर्भाशयात पोहोचतं. त्यामुळे प्रायव्हेट पार्टच्या आकाराचा आणि प्रेग्नन्सीचा काहीही संबंध नाही.Web Title: Leave these worries for healthy sex life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.