शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

लैंगिक जीवन : हस्तमैथुन करणाऱ्यांना 'हे' माहीत असलेच पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 5:04 PM

हस्तमैथुनाबाबत लोकांमध्ये अनेकप्रकारचे गैरसमज असतात. अनेक लोक याला चुकीचं मानतात तर काही लोक याला योग्य मानतात.

(Image Credit : Medical News Today)

हस्तमैथुनाबाबत लोकांमध्ये अनेकप्रकारचे गैरसमज असतात. अनेक लोक याला चुकीचं मानतात तर काही लोक याला योग्य मानतात. पण विज्ञान याला चुकीचं मानत नाही. हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं आणि सामान्य मानण्यात आलं आहे. हस्तमैथुन करताना काही खास गोष्टींची काळजी घेऊ शकता. त्या काय आहेत हे जाणून घेण्याआधी हस्तमैथुनाबाबत काही गैरसमज दूर करून घेऊयात.स्वत:ला आनंद मिळवून देण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला जातो, त्याला हस्तमैथुन मानलं जातं. प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारे करतात. हस्तमैथुन करताना व्यक्ती त्याच्या डोक्यातील सुंदर क्षणांची कल्पना करतो. आणि वीर्यला मोकळी वाट करून देतो.

हे चुकीचं आहे का?

अजिबात नाही. हा स्वत:ला आनंद मिळवून देण्याचा एक नैसर्गिक प्रकार आहे. याने तुम्ही स्वत:ला लैंगिक सुख मिळवून देत असता. याला फार खाजगी मानलं जातं. सार्वजनिक ठिकाणांवर असं काही करू नये कारण असं करणं कायदेशीररित्या गुन्हा आहे. हस्तमैथुन मुलं आणि मुली दोघेही करतात. मुलांमध्ये १७ वयानंतर हस्तमैथुनाची इच्छा वाढू लागते. पण काही मुलांना असं काही करावं वाटत नाही. हस्तमैथुनाची इच्छा होईल तेव्हा त्यांनी असं काही करावं.

आरोग्यासाठी हानिकारक?

नाही. हस्तमैथुनामुळे तुम्ही अंध किंवा वेडे होत नाहीत. तसेच हस्तमैथुन केल्याने डोळ्याखाली डार्क सर्कलही होत नाहीत. तसेच शारीरिक विकासही रोखला जात नाही. वास्तविकता ही आहे की, हस्तमैथुन केल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि शरीराला आनंद देणारे इन्डॉर्फिन हार्मोस रिलीज होतात. याने तुम्हाला रिलॅक्स वाटतं.

मुलींनी घ्यावी ही काळजी

मुली हस्तमैथुन करताना गुप्तांगामध्ये काही वस्तुंचा वापर करतात. हे सेक्स टॉय सुद्धा असू शकतात. पण असं करणं तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. पण त्या वस्तुच्या माध्यमातून बॅक्टेरिया आत जाऊ नये याची काळजीही घ्यावी. कारण असं झालं तर तुम्हाला वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

तज्ज्ञ काय सांगतात?

सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, ‘‘भर तारुण्यात वेळोवेळी उफाळून येणाऱ्या कामवासनेला वाट मोकळी करून देण्यासाठी हस्तमैथुनाचा सुरक्षित मार्ग अवलंबणं गरजेचं असतं. दाटलेल्या लैंगिक उत्तेजनेला मोकळी वाट करून देण्यास जर आपण मज्जाव केला तर तेसुद्धा अनेक प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा घातक ठरू शकतं.’’

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स