लैंगिक जीवन : संबंधावेळी पार्टनरच्या 'या' अंगांना स्पर्श करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:38 PM2019-06-06T16:38:52+5:302019-06-06T16:41:18+5:30

शारीरिक संबंधाआधी पार्टनरची उत्तेजना वाढवण्यासाठी तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श नक्कीच केला असेल.

During sex do not touch these body parts of your female partner | लैंगिक जीवन : संबंधावेळी पार्टनरच्या 'या' अंगांना स्पर्श करणं पडू शकतं महागात!

लैंगिक जीवन : संबंधावेळी पार्टनरच्या 'या' अंगांना स्पर्श करणं पडू शकतं महागात!

googlenewsNext

पूर्णपणे संतुष्टी मिळवून देणाऱ्या शारीरिक संबंधात केवळ पेनिट्रेटिव्ह संबंधच महत्त्वाचे असतात असं नाही. काही वेगळे प्रयोग करूनही पार्टनरच्या गरजा समजून घेतल्या जाऊ शकतात. पण यासाठी तुम्हाला योग्य माहिती असणं गरजेचं आहे. शारीरिक संबंधाआधी पार्टनरची उत्तेजना वाढवण्यासाठी तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श नक्कीच केला असेल. पण अशावेळी कुठे स्पर्श करणं गरजेचं हे जाणून घेण्याआधी कुठे स्पर्श करू नये हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. नाही तर तुमच्या पार्टनरची उत्तेजना वाढण्याऐवजी पूर्णपणे कमी होऊ शकते.

क्लिटरिसचा वरचा भाग

कोणत्याही महिलेच्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग असतो क्लिटरिस. कारण यात अनेक नसा जुळलेल्या असतात. पण फोरप्ले दरम्यान क्लिटरिसच्या वरच्या भागाला फार जास्त जोर लावून स्टिम्यूलेट करण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्या पार्टनरसाठी त्रासदायक ठरू शकतो. जास्त जोर लावण्याऐवजी हलक्या हाताने क्लिटरिसला सर्कुलर मोशनमध्ये रब करा.

सर्विक्स

व्हजायनाला यूट्र्ससोबत जोडणारं एक अंग म्हणजे सर्विक्स. सर्विस्कमध्ये बाळ मोठं होत असतं. जर तुम्ही बोटांचा वापर करून सर्विक्सपर्यंत पोहोचलात तर हे धोकादायक ठरू शकतं. या अंगाला अजिबात स्पर्श करू नये.

पाय

जर तुमच्या पार्टनरने मोजे घातलेले असतील तर त्यांच्या पायांना अजिबात स्पर्श करून नका. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार, पायांमध्ये मोजे घालून शारीरिक संबंध ठेवल्याने ऑर्गॅज्म मिळवण्याचा चान्स अधिक वाढतो. आणि हे लॉजिक पुरूषांसाठी नाही तर महिलांसाठी लागू पडतं.

निप्पल्स

जर तुमच्या पार्टनरला मासिक पाळी सुरू असेल किंवा ब्रेस्टफीडिंग करत असेल तर त्यांच्या निप्पल्सना स्पर्श करणे आणि त्यावर चिमटा काढण्याचा विचारही करू नका. कारण मासिक पाळीदरम्यान त्यांना असं केल्यान अधिक वेदना होऊ शकतात. अर्थात त्यांना वेदना झाल्या तर त्यांचा मूडही जाऊ शकतो.

केस

तुम्हाला हे ऐकायला भलेही विचित्र वाटत असेल, पण कोणत्याही महिलेला त्यांच्या पार्टनर शारीरिक संबंधावेळी त्यांचे केस जोरात ओढलेले किंवा टाइट बांधलेले आवडणार नाही. याने महिलांना वेदना होतात आणि त्यांची उत्तेजनाही कमी होऊ शकते.

Web Title: During sex do not touch these body parts of your female partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.