Condoms may cause of allergies in private part because of latex | लैंगिक जीवन : कंडोममुळेही प्रायव्हेट पार्टमध्ये होऊ शकते अ‍ॅलर्जी, जाणून घ्या लक्षणे...
लैंगिक जीवन : कंडोममुळेही प्रायव्हेट पार्टमध्ये होऊ शकते अ‍ॅलर्जी, जाणून घ्या लक्षणे...

काही लोकांना शारीरिक संबंधावेळी कंडोम वापरल्याने इचिंग, रेडनेस किंवा स्वेलिंगची समस्या होते. या सर्व समस्या लेटेक्स अ‍ॅलर्जीमुळे होतं. त्यामुळे जर तुम्हाला कंडोम वापरताना अशी काही समस्या झाली तर पुन्हा कंडोम वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

काय आहे लेटेक्स?

लेटेक्स रबरच्या दुधाळ थरापासून तयार होतो. मॅन्युफॅक्चर कंडोमसोबतच आणखी इतरही काही प्रॉडक्ट तयार करण्यासाठी लेटेक्सचा वापर केला जातो. नॅच्युरल रबर लेटेक्समध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं. जे अनेकांसाठी अ‍ॅलर्जीचं कारण ठरू शकतं. रिसर्चनुसार, जगभरात कंडोम वापरणाऱ्या केवळ ४.३ टक्केच लोकांना याप्रकारची अ‍ॅलर्जीची समस्या असते.

वाढू शकते ही अ‍ॅलर्जी

जर कुणाला लेटेक्समुळे अ‍ॅलर्जी झाली तर पुन्हा पुन्हा कंडोम किंवा लेटेक्सच्या प्रॉडक्टचा वापर केल्याने अ‍ॅलर्जी आणखी वाढू शकते. याची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी, पण गंभीर असू शकतात.

ही असतात लक्षणे

लेटेक्स सेंसिटिव लोकांमध्ये शारीरिक संबंधादरम्यान किंवा त्यानंतर लक्षणे दिसू शकतात. याने प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ, खाज, सूज किंवा रॅशेजची समस्या होऊ शकते. सुरूवातीला या समस्या हलक्या असतात. पण पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधावेळी कंडोमचा वापर केल्याने समस्या वाढू शकते.

ज्या लोकांना लेटेक्सची अ‍ॅलर्जी असते, त्यांना प्रायव्हेट पार्टशिवाय घशात खवखव, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, अचानक खोकला येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

काही घातक लक्षणे

काही लोकांमध्ये लेटेक्सचा प्रभाव फारच घातक स्तरावर बघायला मिळतो. याला एनाफिलेक्सिस असं म्हणतात. अनेकदा याने जीवालाही धोका होऊ शकतो. एनाफिलेक्सिस झाल्यावर इम्यून सिस्टीम वेगाने असे तत्त्व रिलीज करतं, ज्यामुळे शरीरात सूजही येते. 

एनाफिलेक्सिसची लक्षणे

या लक्षणांमध्ये लो ब्लड प्रेशर, मळमळ होणे, उलटी होणे, पोट दुखणे, चक्कर येणे ही लक्षणे दिसतात. सोबतच कार्डियाक अटॅकचाही या लक्षणांमध्ये समावेश होतो. प्रभावित व्यक्तीमध्ये हे लक्षण सुरूवातीला कमी प्रमाणात दिसतात. मात्र नंतर वेगाने वाढतात. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

काय असतात उपाय?

डॉक्टर पेशंटच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार, त्यावर उपचार करतात. अनेकदा लेटेक्सची उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही लेटेक्स अ‍ॅलर्जी होऊ शकते. अशावेळी डॉक्टर तुमच्या त्वचेशी संबंधित काही टेस्ट करतात, ज्या प्रोटीन रिलेटेड असतात आणि त्यानुसार तुम्हाला औषधं देतात.


Web Title: Condoms may cause of allergies in private part because of latex
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.