शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच

By admin | Updated: July 27, 2014 00:19 IST

जी. श्रीकांत : लोकाभिमुख प्रशासनावर भर

सातारा : ‘मी ही कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार असून, लोकाभिमुख प्रशासनावर जास्तीत जास्त भर देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. येथील जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी बातचित केली. ते म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अधिकारी म्हणून मी येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्'ात माझी नियुक्ती झाली आहे. ऐतिहासिक साताऱ्यात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. सातारा जिल्हा परिषद ही राज्यात अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेला चांगली परंपरा आहे. ती कायम जपण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य यांना बरोबर घेऊन केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वस्तरातील लोकापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ई लर्निंगवर अधिक भर देणार आहे.सध्या पाणी हा प्रश्न केंद्रबिंदू झाला आहे. सर्वांना स्वच्छ पाणी मिळायला हवे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. शहरातील सुविधा ग्रामीण भागातही मिळायला हव्यात. त्यासाठी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ग्रामीण भागाचा दौरा करणार आहे. तेथील समस्या जाणून घेणार आहे. दुष्काळ असणाऱ्या ठिकाणी विकासाला जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)