शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जमिनीच्या अतिक्रमणावरून दोन गटांत धुमश्चक्री; एकमेकांवर दगडफेक, सात ते आठजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:17 IST

दहाजण ताब्यात; जमीन अन् जुन्या वादातून मारामारी

सातारा : जकातवाडी, ता. सातारा येथे जमिनीच्या अतिक्रमणावरून गुरुवारी दुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. तसेच एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये सात ते आठजण जखमी झाले. या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून १० जणांना ताब्यात घेतले. जकातवाडीत रात्री उशिरा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जकातवाडीमधील गायरान जमिनीवर घरे वसलेली आहेत. १९५५ साली या ठिकाणी ११ घरांना परवानगी देण्यात आली होती. आजपर्यंत कुटुंब वाढत गेल्याने या ठिकाणी आता सुमारे ४६ घरे झालेली आहेत. या परिसरातील काही मुलांचा वर्षापूर्वी गावातील एका कुटुंबाशी वाद झाला होता. हा वाद गेल्या वर्षभर चिघळत आहे. त्यातूनच गायरानावरील अतिक्रमण काढण्यासाठी काही जणांनी लेखी अर्जही केले होते. परंतु, त्यावर मार्ग निघालेला नाही. दुसरीकडे वस्तीतील लोकांनाही अतिक्रमण कायम करून मिळण्यासाठीही प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, त्याबाबतही निर्णय झालेला नाही.या वादातून काही दिवसांपूर्वी त्या दोन गटांमध्ये वादही झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीही दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून दोन्ही गटांत सातत्याने काही ना काही वाद होत होता. मोबाइलवर एकमेकांच्या विरोधात स्टेटस ठेवणे, धमकी देणे, तक्रारी करणे सुरूच होते. हा वाद चिघळू नये यासाठी पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी चार महिन्यांपूर्वी दोन्ही गटांची बैठकही घेतली होती.

दरम्यान, गुरुवारी सकाळी जुना वाद पुन्हा उफाळून आला. सकाळी दूध घालायला गेलेल्या मुलाला मारहाण झाल्याचे निमित्त घडले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने जकातवाडी येथे गेले. दोन्ही गटांशी चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान सुमारे ५० ते ६० युवकांनी दांडकी व शस्त्राच्या साह्याने एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये वस्तीमधील घरे, गाड्या व पत्र्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे जकातवाडीत मोठा तणाव निर्माण झाला. यामध्ये दोन गाड्या तसेच अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस