युवकाला मारहाण करून रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:56 IST2019-11-12T14:55:04+5:302019-11-12T14:56:28+5:30
सातारा येथील विकास नगरमधील श्रेयस दत्तात्रय कदम (वय २३) याला अनोळखी दोघाजणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी रात्री वाढे फाटा परिसरात घडली.

युवकाला मारहाण करून रोकड लांबविली
ठळक मुद्देयुवकाला मारहाण करून रोकड लांबविलीवाढे फाट्यावरील घटना : दोन अनोळखी युवकांचे कृत्य
सातारा : येथील विकास नगरमधील श्रेयस दत्तात्रय कदम (वय २३) याला अनोळखी दोघाजणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी रात्री वाढे फाटा परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रेयस कदम हा रात्री जेवण करण्यासाठी वाढे फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथून दुचाकीवरून तो परत येत असताना त्याला दोघाजणांनी अडवले.
त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड आणि मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. जाताना अंगावर मोबाईल फेकून तेथून त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. या प्रकारानंतर श्रेयसने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.