पाडळोशीच्या युवकाची नागठाणे येथे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:03 IST2021-06-12T18:03:21+5:302021-06-12T18:03:49+5:30
Crimenews Satara : पाटण तालुक्यातील पाडळोशी येथील एकाने दारुच्या नशेत नागठाणे येथील एका खताच्या गोदामात गळफास घेवून आत्महत्या केली. अजय रामचंद्र ढेरे (वय ३२, रा. पाडळोेशी, ता. पाटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

पाडळोशीच्या युवकाची नागठाणे येथे आत्महत्या
सातारा : पाटण तालुक्यातील पाडळोशी येथील एकाने दारुच्या नशेत नागठाणे येथील एका खताच्या गोदामात गळफास घेवून आत्महत्या केली. अजय रामचंद्र ढेरे (वय ३२, रा. पाडळोेशी, ता. पाटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय ढेरे याने दारुच्या नशेत नागठाणे येथे असणाऱ्या राजदीप रामचंद्र रांजने यांच्या खताच्या गोदामात दि. १० जून रोजी सकाळी साडेदहा ते दि. ११ जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबची खबर आकाश नारायण निकम (वय २५, रा. नागठाणे, ता. सातारा) याने दिल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात याची नोंद झाली. अधिक तपास सहायक फौजदार फरांदे करत आहेत.