ट्रॅक्टरमधून पडून युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:37 IST2021-03-17T10:35:49+5:302021-03-17T10:37:24+5:30
Accident Satara-भरधाव ट्रॅक्टरमधून पडून पंचवीस वर्षीय युवक जागीच ठार झाला असून, रात्री उशिरापर्यंत संबंधित युवकाची ओळख पटली नव्हती. संबंधित युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

ट्रॅक्टरमधून पडून युवक जागीच ठार
सातारा: भरधाव ट्रॅक्टरमधून पडून पंचवीस वर्षीय युवक जागीच ठार झाला असून, रात्री उशिरापर्यंत संबंधित युवकाची ओळख पटली नव्हती. संबंधित युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेने २५ वर्षीय युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. मात्र, रुग्णवाहिकेच्या चालकाने संबंधित युवकाचा नेमका कोठे अपघात झाला, याची माहित न देता रुग्णवाहिका निघून गेली. त्यामुळे संबंधित युवकाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले आहे.
दरम्यान, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून रुग्णवाहिकेचा नंबर शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित मृत युवकाच्या अंगात निळी जीन्स पॅन्ट आणि गुलाबी शर्ट आहे. याबाबत कोणास माहिती असल्यास जिल्हा रुग्णालयातील पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.