A youth drowned while swimming in Urmodi river | उरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

उरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

ठळक मुद्देउरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यूसातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

सातारा : मित्रांसोबत उरमोडी नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा उरमोडी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

बिलाल अलीम शेख (वय २१, रा. मल्हारपेठ, सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बिलाल शेखसह अन्य एक मित्र उरमोडी, ता. सातारा येथील नदीवर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असतानाच बिलाल शेखची दमछाक झाली.

ही बाब त्याच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरड केली. मात्र, आजूबाजूला कोणीही नव्हते. सरतेशवेटी त्याने अंबवडे खुर्द गावामध्ये जाऊन काही लोकांना बोलावून घेतले. मात्र, तोपर्यंत बिलालचा बुडून मृत्यू झाला होता. नागरिकांनी नदीत शोध घेऊन बिलालचा मृतदेह बाहेर काढला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: A youth drowned while swimming in Urmodi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.