Youth commits suicide by strangulation in Satara | साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देसाताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्यापोलीस करत आहेत चौकशी

सातारा: येथील यादोगोपाळ पेठेतील आकाश शरद लाटकर (वय ३०) याने शनिवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश लाटकर याचे मोती चौकामध्ये पेढ्याचे दुकान आहे. या दुकानांमध्ये तो
वडिलांसमवेत काम करत होता. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे तो जेवण करून बेडरूममध्ये झोपण्यास गेला. मात्र शनिवारी सकाळी बराच वेळ तो बेडरूममधून बाहेर आला नाही म्हणून घरातल्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आकाशने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समोर आले नसून पोलीस नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत.

Web Title: Youth commits suicide by strangulation in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.