महाबळेश्वरमध्ये विलगिकरण कक्षात युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 14:30 IST2020-05-31T14:28:34+5:302020-05-31T14:30:06+5:30

पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Youth commits suicide in separation room in Mahabaleshwar | महाबळेश्वरमध्ये विलगिकरण कक्षात युवकाची आत्महत्या

महाबळेश्वरमध्ये विलगिकरण कक्षात युवकाची आत्महत्या

ठळक मुद्देशनिवारी रात्री संबंधित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील एका गावात संस्थात्मक विलगीकरण केलेल्या एका २७ वर्षीय युवकाने कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित युवकाने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर तालुक्यातील एका गावात १५ दिवसांपूर्वी संबंधित युवक मुंबईहून गावी आला होता. त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री संबंधित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर याची माहिती महाबळेश्वरच्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Youth commits suicide in separation room in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.