झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; परिसरात खळबळ, साताऱ्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 14:37 IST2022-01-31T14:37:49+5:302022-01-31T14:37:55+5:30
सदर प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; परिसरात खळबळ, साताऱ्यातील घटना
सातारा : येथील पॉवर हाऊसजवळील एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार, दि. २९ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
नितीन रघुनाथ पवार (वय ३६,रा.मंगळवार पेठ, बोगदा परिसर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन पवार याने पहाटेच्या सुमारास जुन्या मेडिकल इमारतीशेजारी असणाऱ्या एका वडाच्या झाडाला गळफास घेतला.
सदर प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. झाडावरून मृतदेह उतरवून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. नितीन पवार याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली. हे अद्याप समोर आले नसून, पोलीस त्याच्या घरातल्यांकडे चाैकशी करत आहेत.