तरूणीचा विनयभंग करून आईलाही मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:11 IST2020-02-06T15:10:13+5:302020-02-06T15:11:18+5:30
दुचाकीवरून मायलेकी जात असताना शाहूकला मंदिराजवळ एका युवकाने त्यांची गाडी आडवून तरूणीचा विनयभंग केला तर आईला मारहाण केली. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी अनोळखी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तरूणीचा विनयभंग करून आईलाही मारहाण
सातारा : दुचाकीवरून मायलेकी जात असताना शाहूकला मंदिराजवळ एका युवकाने त्यांची गाडी आडवून तरूणीचा विनयभंग केला तर आईला मारहाण केली. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी अनोळखी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित पीडित तरूणी आणि तिची आई दुचाकीवरून राजवाड्याकडे येत होत्या. त्यावेळी शाहूकला मंदिराजवळ चार ते पाचजण युवक आपापसात वाद करत होते. हे पाहून संबंधित तरूणीने दुचाकी दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला.
संबंधित युवकाने त्या युवकाशी गैरवर्र्तणूक केली तसेच आईच्या कानाखाली मारली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरूणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. काहीही कारण नसताना संबंधित युवकाने मायलेकीशी गैरप्रकार केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधिताला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
साताऱ्यांत डॉक्टर महिलेचा विनयभंग
तू माझ्याशी लग्न कर, मला तू खूप आवडतेस, असे म्हणून एका डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नितीन बबन साळुंखे (रा. कर्मवीर नगर, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित महिला डॉक्टर ही औद्योगिक वसाहतीमध्ये दि. ३ रोजी जात असताना संशयिताने तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.