जुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 13:57 IST2019-04-24T13:56:34+5:302019-04-24T13:57:46+5:30

पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ​​​​​​​

Young man suffers from old quarrels, crime against three | जुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा

जुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा

ठळक मुद्देजुन्या भांडणातून युवकाला बेदम मारहाणतिघांवर गुन्हा: डोक्यात दगड घातल्याने जखमी

सातारा : पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मोन्या (रा. महादरे, ता. सातारा), सचिन साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा), सचिन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या संशयितांचे पूर्ण पत्ते फिर्यादीला माहित नाहीत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय गोळे आणि सचिन साळुंखे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. या वादातून अक्षयवर संबंधितांनी हल्ला केला.

अंबेदरे येथील महालक्ष्मी मंदिराजवळ अक्षय गोळेला वरील संशयितांनी अडवले. मोन्याने अक्षयच्या डोक्यात दगड घातला तर इतरांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये अक्षय जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Young man suffers from old quarrels, crime against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.