शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

युवा शेतकऱ्याने एकरभर शेतीत घेतले पंधरा लाख रुपयांचे अद्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:33 IST

यशकथा : दुष्काळी तालुक्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- रशिद शेख (औंध, जि. सातारा)

बाजारपेठेचा अभ्यास, शेतीकडे लक्ष आणि जिद्द असेल, तर एखादा शेतकरी अल्पशा जमिनीतूनही लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतो. असेच उदाहरण घालून दिले आहे ते खटाव तालुक्यातील औंध येथील उमेश जगदाळे या युवा शेतकऱ्याने. त्यांनी एकरभर शेतीक्षेत्रात विक्रमी आल्याचे (अद्रक) उत्पादन घेतले आहे. या उत्पादित आल्याला सध्याच्या बाजारभावाने १५ लाख रुपये मिळाले आहेत. दुष्काळी तालुक्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

सातारा जिल्ह्यातील औंध येथील उमेश गोविंद जगदाळे हे शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्याने शेती व्यवसायाकडे वळले. उमेश व रमेश जगदाळे या दोन्ही बंधूंना प्रगतशील शेतीचा सुरुवातीपासूनच ध्यास आहे. येथील दुष्काळी भागात बटाटा हे पीक प्रमुख नगदी पीक मानले जाते; परंतु उमेश जगदाळे यांनी आले पिकाची निवड केली. मे २०१७ मध्ये त्यांनी आल्याची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. त्याअगोदर त्यांनी आपल्या एका एकरात तब्बल दहा ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर वेळच्या वेळी लक्ष देऊन पिकाची निगा राखली. आवश्यक खते, कीटकनाशके, भर टाकणे आदी मशागतीची कामे त्यांनी वेळेत केली. 

आले पिकाची त्यांनी तब्बल १७ महिने संपूर्ण काळजी घेतली. आल्याचे हे पीक ठिबकद्वारे भिजवले, त्यासाठी बेड पद्धतीचा अवलंब केला. या पिकास १ लाख रुपये खर्च आला असून, विक्रीतून १५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेती कशी फायदेशीर करावी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शेणखत व फवारणीत गोमूत्राचा वापर करण्यात आला होता. इंटरनेट तसेच चर्चासत्रातून ज्ञान वाढवले. व्यापाऱ्यांनी जागेवरच विक्री केल्यामुळे वाहतूक, कमिशन, अडत, हमाली आदी खर्च वाचला आहे, त्यामुळे त्यांच्या हातात चांगले पैसे आले आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून शेती करणारे जगदाळे कुटुंबीय हे नेहमी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणारे औंध भागातील शेतकरी आहेत. यापूर्वीही त्यांनी कांदा, मेथी, बटाटा आणि वांग्याचे परिसरात एक नंबरचे उत्पादन घेतले होते. उमेश जगदाळे हे जास्तीत-जास्त शेणखत व गरजेपुरते रासायनिक खतांचा वापर करून आपल्या  प्रत्येक पिकाचे उत्पादन दर्जेदार कसे राहील याकडे बारकाईने लक्ष देतात.

या भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी जगदाळे यांचे मार्गदर्शन घेत असतात. कोणतीही शेतीविषयक पदवी नसताना फक्त अनुभव व उत्कृष्ट नियोजन या जोरावर उमेश जगदाळे  हे नेहमी भरघोष उत्पन्न मिळविण्यात यशस्वी होत आहे. एखाद्या पिकाची लागवडीसाठी निवड करताना, मी त्याचा खर्च, वेळ, बाजारातील परिस्थिती काय आहे याचा विचार करीत असतो. आपले पीक दर्जेदार व उत्तम येण्यासाठी काय करावे, याचे नियोजन डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. दुष्काळ असल्याने कमी पाण्यात उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे उमेश जगदाळे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी