माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:00 IST2019-06-05T12:58:54+5:302019-06-05T13:00:21+5:30

माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे.

You do not talk to me! | माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !

माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !

ठळक मुद्देमाझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच नाहीस !विवाहित महिलेचा पाठलाग करून धमकी; पोलिसांकडून संशयित ताब्यात

सातारा : माझ्याशी बोलली नाहीस तर तू कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सुधीर भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यात संबंधित पीडित महिला नोकरी करते. घरातून येताना आणि जाताना सुधीर भोसले हा तिचा पाठलाग करत होता. तिच्या आॅफीसमधील सहकाऱ्यांना फोटो दाखवून ही महिला लॉजवर जाऊन गैरकृत्य करते, असे सांगून पीडित महिलेची बदनामी तो करत होता.

तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही व तुझ्या पतीला तुझ्यापासून वेगळे करेन, अशी धमकीही त्याने दिली. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेऊन सुधीर भोसले याला ताब्यात घेतले.

Web Title: You do not talk to me!