निरोगी आयुष्यासाठी योगा, प्राणायाम गरजेचा : बागल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:07+5:302021-06-22T04:26:07+5:30
नागठाणे : ‘निरोगी व दीर्घायुष्यासाठी योगा व प्राणायाम करणे काळाची गरज आहे. मानवी जीवनामध्ये योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे,’ असे ...

निरोगी आयुष्यासाठी योगा, प्राणायाम गरजेचा : बागल
नागठाणे : ‘निरोगी व दीर्घायुष्यासाठी योगा व प्राणायाम करणे काळाची गरज आहे. मानवी जीवनामध्ये योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे,’ असे उद्गार कऱ्हाड येथील योगाच्या प्रशिक्षिक रोमा बागल यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स ॲण्ड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना विभागाच्या वतीने आयोजित ‘मानवी जीवनामध्ये योगाचे महत्त्व’ या विषयावर त्या बोलत होत्या.
बागल म्हणाल्या, ‘यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगयोगांना योग असे म्हणतात. तसेच शरीराला निरोगी व ताणतणावापासून दूर ठेवण्यासाठी दैनंदिन योगा करून स्वत:ला समृध्द केले पाहिजे.’
प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘जिथे योगा आहे तिथे आरोग्य असून योगा व प्राणायामामुळे ताणतणाव, दु:ख, राग, उदासीनता, संकटे यांवर सहजपणे मात करता येते. तसेच श्वासाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व योग आणि प्राणायामामुळे श्वासावर नियंत्रण ठेवता येते.’
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप लोखंडे यांनी प्रास्तविक केले. प्रा. गणेश गभाले यांनी सूत्रसंचालन केले. जिमखाना विभागप्रमुख प्रा. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले. तांत्रिक साहाय्य प्रा. संदीप लोखंडे यांनी केले.