होय... सह्याद्री कड्याला हवीत शूरवीरांचीच नावं!--.

By Admin | Updated: December 16, 2014 23:39 IST2014-12-16T22:17:40+5:302014-12-16T23:39:55+5:30

..गर्जा महाराष्ट्र माझा

Yes ... Sahyadri kadali for the names of the knights! | होय... सह्याद्री कड्याला हवीत शूरवीरांचीच नावं!--.

होय... सह्याद्री कड्याला हवीत शूरवीरांचीच नावं!--.

सातारा/महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीचे नाव ‘बॉम्बे’पासून ‘मुंबई’ झाले. इतकेच काय ‘व्हिक्टोरीया टर्मिनस (व्हीटी)’चे नाव ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी)’ होऊ शकते तर महाबळेश्वरच्या पॉर्इंटला देण्यात आलेली ब्रिटिशांची नावे का बदलू शकत नाही? असा सवाल नागरिकांमधून होत असून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या या मोहिमला जिल्ह्यातून उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन, थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये राज्यांतून तसेच परराज्यांतून दरवर्षी लोखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. महाबळेश्वरमध्ये पर्यटक दाखल झाल्यानंतर प्रथम पर्यटकांना महाबळेश्वरच्या माहितीसाठी हॉटेल व्यवस्थापक, टॅक्सी संघटना, गाईड किंवा नकाशा याद्वारे महाबळेश्वरची माहिती दिली जाते.
अनेक पर्यटकांना महाबळेश्वर हे शहर ब्रिटीशकालीन असून येथील पॉर्इंटस्लादेखील त्यांचीच नावे देण्यात आल्याचे सांगण्यात येते. पर्यटक पॉर्इंटचा व तेथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र पर्यटकांनाच काय तर अनेक स्थानिक नागरिकांना ब्रिटिशांची नावे असणाऱ्या या पॉर्इंटचा व्यवस्थीत उच्चार देखील करता येत नाही. तसेच लक्षातही राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे चित्र आजही पहावयास मिळते.
ही अडचण लक्षात घेऊन ‘लोकमत’ने पॉर्इंटस्ची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकले असून या अनुशंगाने सरकारी स्तरावर हालचाली गतीमान झाल्या आहेत.
ब्रिटिशांची नावे असणाऱ्या पॉर्इंटला पडलेली इंग्रजांची नावे बदलून यांना शूर मावळ्यांची नावे द्यावीत, यासाठी ‘लोकमत’ने ‘मर्द मावळ्यांचे सह्याद्रीकडे इंग्रजाळलेलेच!’ असे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर पर्यटक व नागरिकांनी प्वॉइंटची नावे बदलण्याजी
कल्पना उत्कृष्ट असल्याची
प्रतिक्रिया ‘लोकमत’पुढे व्यक्त केली. (प्रतिनिधी)


ब्रिटीशांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. देश लुटून नेला, अशा ब्रिटीशांचा महाबळेश्वरमधील इतिहास व प्रत्येक पॉर्इंटवर असणारी त्यांची नावे ही काळानुसार बदलली पाहिजेत. त्याजागी शूर वीर सरदारांची नावे दिली गेली पाहिजेत.
- सलीम बागवान,
राष्ट्रीय काँग्रेस, जिल्हा सरचिटणीस


महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन आहे. आम्ही अनेकदा या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. येथील पॉर्इंट पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र आहे. मात्र, आजही आम्हाला येथील पॉर्इंटस्ची नावे व्यवस्थित उच्चारता येत नाही व लक्षातही राहत नाही. ही नावे बदलून जर मावळ्यांची नावे दिली गेली तर ती सर्वांच्याच लक्षात राहतील.
- विवेक शहा, पर्यटक


मराठी वैभवाचे नामकरण
मराठीत व्हावे : बानुगडे-पाटील
महाबळेश्वर या मराठी नावाच्या पायपोटातही इंग्रजी नावे कशाला, ती मराठीत असायला हवीत. इंग्रजांनी शोध लावले म्हणून त्यांच्या स्मृती वेगळे फलक लावून जरुर जतन करता येतील. पण मराठी वैभवाचे, सौदर्याचे नामकरण मराठीत व्हायला हवे. येथील किल्ले, गटकोट शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा सांगतात. मराठी वैभवाचे, सौदर्याचे नामकरण मराठीत व्हावे. मातीसाठी धारातिर्थ पडलेल्या रक्तमुद्रा अजून इथल्या मातीत उमटतात. तर अशा मरणातून आपल्या भूमिपुत्रांना वाचविण्यासाठी त्यांना मातीत उगविल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. येथील पॉर्इंटच्या नावातून ते प्रकट व्हायला हवेत. देशविदेशातून येथे पर्यटक भेट देतात. तेथे मराठी पराक्रमाची, कर्तृत्वाची गाथा सांगणारी नावे असतील तर मराठी कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या गौरवाचा डंका जगभरात पोहोचवता येईल. महाबळेश्वरमधील पॉर्इंटला मराठी नावे देण्यात यावीत, ’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्कनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली.

Web Title: Yes ... Sahyadri kadali for the names of the knights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.