शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यवतेश्वर घाटात ढासळलेला संरक्षक कठडा जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

पेट्री : कास मार्गावर यवतेश्वर घाटात बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळले ...

पेट्री : कास मार्गावर यवतेश्वर घाटात बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळले आहेत. सव्वा महिन्यापूर्वी वळवाच्या मुसळधार पावसामुळे साधारण पंचवीस ते तीस फूट लांबीपर्यंतचा संरक्षक कठडा ढासळला होता. माॅन्सूनला सुरुवात झाली तरी अद्याप येथे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही. यामुळे घाटातील वाहतूक ऐन पावसाळ्यात धोकादायक बनत चालली असून, वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कास, बामणोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे असल्याने परिसरात फिरण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे जावे लागते. येथून वर्षभर वाहतूक सुरू असते. खासगी वाहने, अवजड मालवाहतूक, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदारवर्गाची सतत रहदारी असते. शनिवार, रविवार,उन्हाळी सुटीत तसेच जोडून सुटी आल्यास मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक होत असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांचा या मार्गाने प्रवास होत असून, पावसाळ्यात एकीकडे कोसळणारी दरड तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेले संरक्षक कठडे अशा बिकट परिस्थितीत दाट धुक्यातून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. माॅन्सूनला सुरुवात झाली असली तरी पावसाची उघडीप आहे, तोपर्यंत घाटातील दुरुस्तीची कामे तत्काळ होण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

साधारण दहा ते बारा ठिकाणी ढासळलेले कठडे व नादुरुस्त कठड्यांची दुरुस्ती जैसे थे आहे. तसेच पॉवर हाऊसपासून काहीच अंतरावर भला मोठा संरक्षक कठड्याचा भाग पायासहित सव्वा महिन्यांपूर्वी ढासळल्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर, सूचनाफलक, कठड्याची दुुरुस्ती व नवीन बांधकामाची मागणी वाहनचालकांतून जोर धरत आहे.

(चौकट)

तत्काळ उपाययोजनेची मागणी

दाट धुके, मुसळधार पाऊस त्यात एकीकडे कोसळणारी दरड व दुसरीकडे ढासळलेले कठडे यामुळे कोणतीही विपरीत घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, स्थानिकांतून होत आहे.

१४पेट्री

फोटो : सव्वा महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर ढासळलेल्या कठड्याची अद्याप कोणतीही दुरुस्ती नाही. (छाया : सागर चव्हाण)