शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

यवतेश्वर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात दरड पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी तीन ते चार ठिकाणी मुसळधार ...

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात दरड पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी तीन ते चार ठिकाणी मुसळधार पावसाने रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या. ही दरडी रस्त्यालगत तसेच पाणी वाहून नेणाऱ्या चरीमध्ये कोसळल्या असल्याने वाहतुकीस कोणताही अडसर निर्माण झाला नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या चरीवर दरडी कोसळून या चरी मुजल्याने रस्त्यावर पाणी, माती, बारीक दगड काही प्रमाणात आले आहेत. जेसीबीद्वारे चरी मोकळ्या करण्याचे काम सुरू आहे.

शहराच्या पश्चिमेकडील परिसरात पडत असणाऱ्या सततच्या मुसळधार पावसाने यवतेश्वर घाटात गुरुवारी तीन ठिकाणी तसेच शुक्रवारी एका ठिकाणी लहान मोठ्या स्वरूपात मुरूम, माती, दगड अशा दरडी रस्त्यालगतच्या चरीत पडल्याने चरी मुजल्या होत्या. पाण्यासोबत रस्त्यावर मुरूम, माती येऊन वाहनचालकांना कोणताही अडसर निर्माण होऊ नये यासाठी मुसळधार पावसात चरीत व रस्त्यालगत पडलेली दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

दरवर्षी या घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वारंवार व मोठ्या प्रमाणावर घडत असते. परंतु यंदा घाटातील बहुतांशी रस्ता रूंदीकरण केल्याने कोसळलेल्या दरडी रस्त्यावर आल्या नाहीत. बहुतांशी ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंती बांधल्यामुळे रस्त्यावर मुरूम माती न येण्यास मदत झाली. ज्या ठिकाणी चरी मुजल्या त्या ठिकाणची माती, पाणी, बारीक दगड काही प्रमाणात रस्त्यावर आली.

चौकट

गेल्या तीन-चार दिवसांपासून घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळत आहेत. घाटात डोंगरालगत असुरक्षित ठिकाणी उभे राहून काही पर्यटक फोटोसेशन करतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हे धोकादायक ठरून दरड कोसळून जीवावर बेतू शकते.

फोटो

१८यवतेश्वर घाट

सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात शुक्रवारीही काही ठिकाणी दगड माती रस्त्यावर पडली होती. त्यामुळे दुचाकी वाहने चालविणे अवघड झाले होते. (छाया : सागर चव्हाण)