शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी चुकीची कागदपत्रे, थेट कारवाई होणार; सातारा जिल्हा परिषदेने गठीत केली समिती

By नितीन काळेल | Updated: May 21, 2025 19:18 IST

पारदर्शकतेसाठी समिती गठीत; संकेतस्थळावर तक्रार करा 

नितीन काळेल सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत गट क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया सुरू आहे. बदल्या पारदर्शक आणि निपक्षपाती होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आले आहे. यामुळे चुकीची कागदपत्रे सादर करुन फायदा घेणाऱ्यावर थेट कारवाईच होणार आहे. तसेच यासाठी संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.जिल्हा परिषदे अंतर्गत दरवर्षी गट क आणि ड संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडते. यंदाही ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बदली प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे तयार करुन चुकीच्या पद्धतीने बदलीचा फायदा घेण्यात येतो. तसेच दिशाभूल होणारी माहिती कर्मचारी सादर करतात. याबाबत विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी, बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नि:पक्षपाती होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यमाुळे बदलीसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास समितीमार्फत चाैकशी करण्यात येईल. तसेच वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेसाठी चुकीची कागदपत्रे तयार केल्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही करता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने बदली घेणाऱ्यांविरोधात कारवाई करणे सोपे जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदTransferबदली