‘गुरुकुल’च्या मुग्धेश कोडगने रचला स्केटिंगमध्ये विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 22:34 IST2017-10-11T22:34:18+5:302017-10-11T22:34:22+5:30

‘गुरुकुल’च्या मुग्धेश कोडगने रचला स्केटिंगमध्ये विश्वविक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गुरुकुलच्या इंग्रजी माध्यममध्ये पहिलीचा विद्यार्थी मुग्धेश कोडग याची शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब कर्नाटक यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्केटिंग प्रकारात सलग ५१ तास स्केटिंग केले. त्याच्या या विक्रमाबद्दल ‘गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये त्याच्या नावाची नोंद झाली आहे.
या यशाबद्दल मुग्धेश कोडगचे गुरुकुलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, पर्यवेक्षक मोहन बेदरकर, माध्यमिक विभागाच्या प्रमुख सोनाली तांबोळी, अनुराधा कदम यांनी कौतुक केले.
स्केटिंगमध्ये विश्वविक्रम करण्यासाठी या खेळास १ जून २०१७ रोजी दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होऊन जून २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सलग ५१ तास स्केटिंग करत हा विक्रम केला. नुकतेच लंडन येथील गिनिज बुक आॅफ रेकॉर्डच्या कार्यालयातर्फे मुग्धेशला प्रमाणपत्र देण्यात आले. आनंद गुरव, मधुकर जाधव, अॅड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदीश खंडेलवाल यांनी त्याचे कौतुक केले.