शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

जागतिक मतिमंद दिन : सातारकरांचे लक्ष वेधण्यासाठी मतिमंद मुले थिरकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:20 PM

बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देपोवई नाक्यावर केले देखणे नृत्यभंडारा छिडक-छिडकवर मतिमंद मुले थिरकलीपोवई नाका सकाळी काही वेळासाठी थबकला

सातारा :  बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.जागतिक अपंग सप्ताह सर्वत्र साजरा होत आहे. त्यापैकी दि. ८ डिसेंबरला जागतिक मतिमंद दिनाच्या निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शहर व परिसरातील मतिमंद शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

मतिमंद मुलांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, आशा भवन, एहसास मतिमंद मुलांचे बालगृह आणि सक्षम या संस्था सहभागी झाल्या होत्या.

पोवई नाक्यावर रॅली आल्यानंतर आशा भवनच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मतिमंद विद्यार्थ्यांचे नृत्य बघण्यासाठी पोवई नाका परिसरात वाहनांची चाके थबकली.

नृत्य करताना विद्यार्थ्यांमध्ये असणारा जोश आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वांनीच त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाल्यानंतर सातारकरांनी त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChildren Dayबाल दिन