शहरं
Join us  
Trending Stories
1
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
2
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
3
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
4
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
5
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
6
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
7
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
8
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
9
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
10
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
11
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
12
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
13
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
14
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
15
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
16
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
17
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
18
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
19
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
20
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा

Satara: मिनी मंत्रालयात ‘नारीशक्ती’; महिला अधिकाऱ्यांकडून कार्याचा ठसा 

By नितीन काळेल | Updated: March 7, 2025 19:38 IST

सातारा : प्रशासनात महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्हा परिषदेतही महिला राज आहे. कारण, एकूण १६ विभागापैकी सहा ...

सातारा : प्रशासनात महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्हा परिषदेतही महिला राज आहे. कारण, एकूण १६ विभागापैकी सहा ठिकाणी महिला अधिकारी आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे ४० टक्के विभागांचा कारभार हा ‘नारीशक्ती’च्या हाती आला असून त्यांनी कार्याचा ठसाही उमटवलाय.प्रशासनात पूर्वी पुरुष अधिकाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती. पण, १० वर्षांपासून महिला अधिकारीही मोठ्या संख्येने प्रशासनात आल्या आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्या प्रशासनात येत आहेत तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन आदींसह विविध विभागांत कार्यरत राहून कर्तबगारीही गाजवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत आज महिला अधिकारी कार्यरत आहेत तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय येथील वरिष्ठ पदावर महिला अधिकारी विराजमान झाल्या होत्या. मात्र, ६० वर्षांच्या इतिहासात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नव्हती. पण, राज्य शासनाने गेल्यावर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्या केल्या. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन यांची नियुक्ती केली. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रथमच एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी झाली. त्यानंतर या मिनी मंत्रालयात ‘नारीशक्ती दिसून आली.सातारा जिल्हा परिषदेत सध्या ६ महिला अधिकारी आहेत. यामध्ये ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अर्चना वाघमळे आहेत. मागील तीन वर्षांहून अधिक काळ त्या विभागाचा कारभार पाहत आहेत. महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहिणी ढवळे यांची नियुक्ती झालेली आहे. त्याही मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर आहेत.तर माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी प्रभावती कोळेकर सुमारे तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्या सातारा जिल्हा परिषदेतच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी कार्यरत होत्या. त्याचबरोबर पाणी व स्वच्छता विभागाची धुरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने या पाहत आहेत. मागील वर्षापासून त्यांनी या विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे. या सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून ठसा उमटवलाय हे विशेष.

तीन महिला अधिकारी साताऱ्यातीलच..सातारा जिल्हा परिषदेतील ६ पैकी तीन महिला अधिकारी या साताऱ्याच्या आहेत. अर्चना वाघमळे या सातारा तालुक्यातील आहेत. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या खटाव तालुक्यातील एनकूळ गावच्या आहेत. तसेच खटाव तालुक्यातीलच अंबवडे हे त्यांचे सासर आहे. महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांचे सासर सातारा जिल्ह्यात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदWomen's Day Specialजागतिक महिला दिन