शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महिलेला खिडकीला बांधून घरावर सशस्त्र दरोडा, चौदा शेळ्या-करडांसह दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:51 IST

वरकुटे-मलवडीतील घटना

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील एका पेट्रोल पंपानजीक राहणाऱ्या सुनीता राजेंद्र यादव (वय ४०) यांच्या घरावर पाचजणांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना खिडकीला बांधले. त्यांच्या कानातील कर्णफुलांसह गळ्यातील सोन्याची माळ आणि घरासमोरील आठ शेळ्या अन् सहा लहान-मोठी करडं दरोडेखोरांनी गाडीतून चोरून नेली. ही धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. लंपास केलेल्या मालाची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.वरकुटे मलवडीपासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या मल्हारपेठ रस्त्यावर एक पेट्रोल पंप आहे. तेथून पूर्वेला हाकेच्या अंतरावर सुनीता यादव यांचे घर आहे. घरी आई आणि मुलगा दीपक दोघे राहत असून, रात्री जेवण करून सुनीता यादव या घरासमोरील कट्ट्यावर शेळ्यांच्या गोठ्यानजीक झोपल्या होत्या, तर मुलगा शेतीला पाणी देण्यासाठी नजीकच्या शेतात गेला होता. या संधीचा फायदा घेत रात्री दीड ते दोनच्या सुमारास घरामागून पाच दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.दोघांनी सुनीता यांना जबरदस्तीने घरात नेऊन खिडकीला बांधले, त्यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील कर्णफुले काढून घेतली. त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यातील सोन्याच्या मण्यांची माळ घेतली. शेळ्यांच्या गोठ्यातील आठ शेळ्या आणि सहा लहान-मोठी करडं चारचाकी गाडीत टाकून दरोडेखोरांनी पोबारा केला.या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी तत्काळ ५० हजारांच्या शेळ्या मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने दरोडेखाेरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली. बीट अंमलदार रूपाली सोनवणे या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस