शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: प्रेम प्रकरणातून महिलेवर कोयत्याने वार, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:55 IST

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

कऱ्हाड/मलकापूर : प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले. मलकापूर-आगाशिवनगर येथे भरवस्तीत काल, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कोयता हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रवींद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर), असे हल्लेखोराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत जखमी महिलेच्या वडिलांनी कऱ्हाड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.आगाशिवनगर येथील एका महिलेचा विवाह झाला असून, नवऱ्यासोबत झालेल्या वादामुळे ती महिला आई-वडिलांकडे राहते. तिला तीन अपत्य आहेत. संबंधित महिलेचा रवींद्र याच्याशी पूर्वीचाच परिचय आहे. या परिचयातून त्यांची ओळख वाढून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरुवारी सायंकाळी रवींद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर रवींद्रने महिलेवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याने केलेला वार तिच्या कानापासून जबड्यापर्यंत गेला आहे. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.हल्लेखोर रवींद्र पवार तेथून पळून गेला आहे. त्याचा शोध पोलिसांची तीन पथके घेत आहेत. पीडित महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

हल्लेखोराच्या शोधासाठी श्वान पथकमहिलेवर हल्ला केल्यानंतर संशयित रवींद्र पवार हा तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी संशयिताचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागला नाही. सायंकाळी हल्लेखोराच्या शोधासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस