फलटण बसस्थानकात महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:10 IST2020-11-02T20:09:06+5:302020-11-02T20:10:29+5:30
phaltan, murder, sataranews, police फलटण बसस्थानकात ५० ते ५५ वर्षांच्या महिलेचा डोक्यात घाव घालून खून करण्यात आला आहे. महिलेचा खून करून तेथेच झोपलेल्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून संशयावरून अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमातानगर मलटण, ता. फलटण) याला अटक केली आहे.

फलटण बसस्थानकात महिलेचा खून
फलटण : फलटण बसस्थानकात ५० ते ५५ वर्षांच्या महिलेचा डोक्यात घाव घालून खून करण्यात आला आहे. महिलेचा खून करून तेथेच झोपलेल्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेची ओळख पटलेली नसून संशयावरून अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमातानगर मलटण, ता. फलटण) याला अटक केली आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण बसस्थानकातील जुना बारामती स्टँडवर एका महिलेचा फरशीवर तोंड आपटून अथवा कोणत्यातरी कठीण हत्याराने तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारून गंभीर जखमी करून खून केला. बसस्थानकातील सुरक्षारक्षकाने आजूबाजूचे रिक्षाचालक व नागरिकांनी घटनास्थळावरून मृत महिलेजवळच झोपलेल्या संशयितास ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. फलटण पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
संबंधित महिला अनेक दिवसांपासून बसस्थानकात राहत होती. तिला नीट चालता येत नसल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना खायला ती मागायची. तसेच संशयितही बसस्थानक परिसरातच असायचा. घटनास्थळी सातारा येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
याबाबतची फिर्याद राज्य परिवहन महामंडळातील सुरक्षारक्षक दत्तात्रय बबन सोनवलकर (रा. दुधेबावी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण तपास करत आहेत.