चाकात ओढणी अडकली, गो कार्टींग करताना पर्यटक महिलेचा मृत्यू; महाबळेश्वरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:15 IST2023-06-23T12:12:40+5:302023-06-23T12:15:00+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर वेण्णालेक परिसरातील प्रसिध्द गो कार्टिग रेट बटण येथे संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास गो कार्टींग करताना वाहनाच्या ...

चाकात ओढणी अडकली, गो कार्टींग करताना पर्यटक महिलेचा मृत्यू; महाबळेश्वरमधील घटना
महाबळेश्वर : महाबळेश्वर वेण्णालेक परिसरातील प्रसिध्द गो कार्टिग रेट बटण येथे संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास गो कार्टींग करताना वाहनाच्या चाकामध्ये ओढणी अडकून पर्यटक महिला सना अमीर पेटीवाला (वय २४ ) रा. मिरारोड, मुंबई यांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. ही घटना गुरुवार सायंकाळी घडली.
या महिलेचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून महाबळेश्वर पोलिस निरिक्षक संदिप भागवंत याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धर्मेद्र पावरा व पोलिस हवालदार संतोष शेलार अधिक तपास करत आहेत.