शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ट्रकने महिलेला चिरडले, पाठलाग करून ट्रकसह ट्रकचालक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:39 IST

कोल्हापूर नाक्यावर आठवड्यात दुसरा बळी..

मलकापूर : ट्रकने धडक देत महिलेला चिरडल्याने ती जागीच ठार झाली. येथील कोल्हापूर नाक्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातातील ट्रकचालक ट्रक घेऊन पसार होत असताना पाठलाग करून गोटेगावच्या हद्दीत संबंधित ट्रक थांबवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.नंदा रामचंद्र पवार (रा. दिवटे गल्ली, कराड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिवटे गल्ली कराड येथील नंदा पवार या एका मुलाच्या (मुलाचे नाव समजू शकले नाही) दुचाकीवरून कराडमध्ये निघाले होते. ते कोल्हापूर नाक्यावर आले असता, पाठीमागून ट्रक (जीजे १६ एवाय ३८६२) ने दुचाकीला धडक दिली. या धडकेत नंदा पवार या दुचाकीवरून खाली पडल्यामुळे ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पैलवान अमृत बाबर, दस्तगिरी आगा, महेश फल्ले, सुनील कदम, अशोक कचरे, रामचंद्र सरगर, आनंदा लोळे, सतीश माळी यांच्यासह कोल्हापूर नाक्यावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कराड शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पंचनामा करून बाबर यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पाठलाग करून ट्रकसह ट्रकचालक ताब्यात..अपघातानंतर संबंधित ट्रकचालक ट्रकसह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचा नागेश कुरले यांनी दुचाकीवरून धाडसाने पाठलाग करून गोटे गावच्या हद्दीत संबंधित ट्रकसह ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात दिले.

कोल्हापूर नाक्यावर आठवड्यात दुसरा बळी..कोल्हापूर ते सातारा लेनवर दहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात मलकापुरातील एकजण ठार झाला होता. दहा दिवसांतच मंगळवारी ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन महिला जागीच ठार झाली. केवळ दहा दिवसांतच दोन अपघात होऊन दोन बळी गेल्यामुळे हे ठिकाण डेंजर झोन बनत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Crushed by Truck in Karad, Driver Apprehended After Chase

Web Summary : A woman died instantly after being hit by a truck near Kolhapur Naka, Karad. The truck driver fled but was caught by locals and handed over to the police. This is the second fatality in the area within ten days, raising safety concerns.