धक्कादायक! पत्ता न सांगितल्याने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली, शाळकरी मुलगा भाजून जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 19:37 IST2022-01-03T19:37:00+5:302022-01-03T19:37:21+5:30

अपूर्वला तेजस ढाबा कोठे आहे, असे विचारले असता त्याने त्या अनोळखी युवकांना मला माहिती नाही, असे सांगितले. याचा राग येऊन गाडीतील एका युवकाने अपूर्व याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकले.

Without telling the address he threw petrol on his face and lit a stick The schoolboy was burnt and injured in satara | धक्कादायक! पत्ता न सांगितल्याने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली, शाळकरी मुलगा भाजून जखमी

धक्कादायक! पत्ता न सांगितल्याने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली, शाळकरी मुलगा भाजून जखमी

सातारा : तेजस ढाबा कुठे आहे, हे मला माहिती नाही, असे सांगताच कारमधील चार युवकांपैकी एका युवकाने १३ वर्षांच्या शाळकरी मुलाच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली. यामध्ये त्या मुलाचा चेहरा भाजून तो जखमी झाला. अपूर्व जाधव (वय १३, रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) असे या जखमी मुलाचे नाव आहे.

या प्रकरानंतर संबंधित मुले तेथून पसार झाली. ही खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील उरमोडी धरणानजिक  काल, रविवारी (दि.२) दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपूर्व जाधव हा रविवारी दुपारी गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. यावेळी एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्या कारमध्ये चार युवक होते. त्यांनी अपूर्वला तेजस ढाबा कोठे आहे, असे विचारले असता त्याने त्या अनोळखी युवकांना मला माहिती नाही, असे सांगितले. 

याचा राग येऊन गाडीतील एका युवकाने अपूर्व याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकले. त्यानंतर काडी पेटवून त्याच्या चेहऱ्यावर टाकली. या प्रकारानंतरसंबंधित मुले तेथून पसार झाली. 

या प्रकाराची माहिती अपूर्वने घरी जाऊन सांगितल्यानंतर त्याला घेऊन घरातले लोक सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले. अपूर्ववर प्राथमिक उपचार केल्यानंतर दिनकर बाजीराम जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सातारा तालुका पोलीस या कारचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास हवालदार यादव हे करीत आहेत.

Web Title: Without telling the address he threw petrol on his face and lit a stick The schoolboy was burnt and injured in satara