Windy Sixteen Murders: The Baba gang in Mecca to Mecca | पवन सोळवंडे खूनप्रकरण : कऱ्हाडातील जे बाबा टोळीला मोक्का

पवन सोळवंडे खूनप्रकरण : कऱ्हाडातील जे बाबा टोळीला मोक्का

ठळक मुद्देपवन सोळवंडे खूनप्रकरण : कऱ्हाडातील जे बाबा टोळीला मोक्का२१ जणांवर कारवाई; गुन्हेगारी टोळ्यांना हादरा

कऱ्हाड : पवन सोळवंडे खून प्रकरणातील जे बाबा ऊर्फ जुनेद शेख टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीत २१ जणांचा समावेश असून, या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कऱ्हाडात २१ आॅगस्ट रोजी रात्री बेछूट गोळीबार करून पवन सोळवंडे या गुंडाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी ह्यजे बाबाह्ण टोळीचा प्रमुख जुनेद फारूख शेख (वय ३०, रा. शिवाजीनगर, मलकापूर), समीर इस्माईल मुजावर (३०, सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर), शिवराज सुरेश इंगवले (२४, लाहोटीनगर, मलकापूर), अल्ताफ राजेखान पठाण (५०), निहाल अल्ताफ पठाण (२४, दोघेही रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड ), मजहर बद्रुद्दीन पिरजादे (२८, अहिल्यानगर, मलकापूर), हैदर महिबूब मुल्ला (२६, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड ), पितांबर ऊर्फ पप्पू विश्वास काटे (२६, बैलबाजार रोड, मलकापूर), सिकंदर बाबू शेख (२९, रा. विंग, ता. कऱ्हाड ), प्रमोद ऊर्फ अप्पा तुकाराम जाधव (३७, रा. साईनगर, कऱ्हाड ), निरज आनंदराव पानके (२६, कोयना वसाहत, कऱ्हाड ), अक्षय ऊर्फ महादेव संजय मोकाशी (२५, रा. बागल वस्ती, आगाशिवनगर), दिवाकर ऊर्फ गोंद्या बाबूराव गाडे (२७, रा. साईनगर, मलकापूर), विजय बिरू पुजारी (२०, रा. बैलबाजार रोड, मलकापूर), सोहेल राजुभाई मुलाणी (२८, ज्ञानदीप कॉलनी, मलकापूर), आकीब लियाकत पठाण (रा. मलकापूर), अक्षय साहेबराव धुमाळ (रा. मलकापूर), सॅम ऊर्फ समीर नुरमहम्मद मोमीन (रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड ), अल्फाद कासीम शेख (रा. मलकापूर), आयुब बेली (रा. मलकापूर) या २१ जणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पाठविला होता.

अधीक्षक सातपुते यांनी हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सूरज वारके यांना पाठविला. महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, जे बाबा टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव तपास करीत आहेत.

Web Title: Windy Sixteen Murders: The Baba gang in Mecca to Mecca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.