शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
NEET Paper Leak : प्रश्न जुळवल्यानंतर मला धक्काच बसला', नीट पेपरफुटी उघडकीस आणणाऱ्या शिक्षकांची मोठी माहिती
3
'मेलोडी गिफ्ट'वर राहुल गांधींची टीका; म्हणाले, "शेतकरी, तरुण, महिला, कामगार, व्यापारी रडत असताना..."
4
१२ मे २०२५ ते १२ मे २०२६; ओळख, लग्न अन् वर्षभरातच ट्विशा शर्माच्या आयुष्याचा भयंकर शेवट!
5
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
6
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
7
Travel : भारताचं 'लिटिल इंग्लंड'! रोमँटिक ट्रीपचा प्लॅन करताय? मग 'या'हिल स्टेशनला नक्की भेट द्या
8
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
9
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
10
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
11
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
12
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
13
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
14
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
15
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
16
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
17
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
18
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
19
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
20
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांचा शब्द सुनेत्रा पवार पूर्ण करणार काय?, दिल्लीत महाराष्ट्र सदनातील यशवंतरावांचा पुतळा कधी बदलणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:44 IST

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदरचा पुतळा बदलण्याचा शब्द दिला. पण या दिलेल्या शब्दाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली, मात्र त्यात काहीच प्रगती दिसत नाही

प्रमोद सुकरे

कराड : दिल्लीत महाराष्ट्र सदनमधील आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा व्यक्तिमत्वाशी विसंगत असणारा पुतळा गत दोन वर्षांपासून यशवंतप्रेमींना खटकत आहे. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळा बदलण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली होती. मात्र, त्याला दोन वर्षे होत आली तरी काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा व्यक्तिमत्वाशी विसंगत असणारा पुतळा बदलला जाणार का? अजित पवारांनी दिलेला शब्द विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पूर्ण करणार का? अशा प्रतिक्रिया त्यांची कर्मभूमी असलेल्या कराडमधील यशवंतप्रेमींमधून व्यक्त होत आहेत.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा बसवणे ही कराडकरांसाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. पण त्या पुतळ्याची छायाचित्रे समोर आल्यानंतर यशवंतप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कारण हा पुतळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत वाटत आहे.

यशवंतप्रेमींची नाराजी लक्षात आल्यावर याबाबत ५ जुलै २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदरचा पुतळा बदलण्याचा शब्द दिला. पण या दिलेल्या शब्दाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली, मात्र त्यात काहीच प्रगती दिसत नाही. साहजिकच यशवंतप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

महिनाभरापूर्वी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे आता यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा बदलण्याच्या त्यांनी दिलेल्या शब्दाचं काय? हा प्रश्न यशवंतप्रेमींच्या मनात घर करत आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार आता हा शब्द पूर्ण करणार का? याकडे यशवंतप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

यशवंतप्रेमींमध्ये नाराजी 

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कराडची ओळख आहे. कराडातील त्यांचे स्मृतिस्थळ जणू राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीला राज्यातील राजकीय मंडळी येथे नतमस्तक होण्यासाठी येतात; पण त्यांचा महाराष्ट्र सदनातील बसवलेला पुतळा बदलला जात नसल्याने यशवंतप्रेमींमधून नाराजी समोर येणे स्वाभाविक आहे.