पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण,पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:31 IST2019-07-30T13:23:08+5:302019-07-30T13:31:17+5:30
घरगुती वादातून पतीने पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंते तर्फ पिलेश्वरनगरमध्ये घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.

पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण,पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा
ठळक मुद्देपत्नीला पट्ट्याने बेदम मारहाणपोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल
सातारा : घरगुती वादातून पतीने पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना करंते तर्फ पिलेश्वरनगरमध्ये घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप तानाजी पिसाळ (रा. पिलेश्वरनगर, करंजे तर्फ सातारा. मूळ रा. सनपाने, ता. जावळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप पिसाळ याने दारूच्या नशेत घरगुती किरकोळ कारणातून पत्नी ज्योती पिसाळ (वय ३२) हिला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली.
हा प्रकार वारंवार घडत असल्याचे ज्योती हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.