कोण सांगणार यांना.. ‘आलाय कोरोना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:41+5:302021-02-23T04:59:41+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन चिंतित आहे. मात्र चांगले शिकलेली तरुणाई बिनधास्तपणे ...

Who will tell .. ‘Alay Corona’ | कोण सांगणार यांना.. ‘आलाय कोरोना’

कोण सांगणार यांना.. ‘आलाय कोरोना’

Next

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन चिंतित आहे. मात्र चांगले शिकलेली तरुणाई बिनधास्तपणे विनामास्क बाजारातून फिरत आहे. कोरोना आला असल्याचे यांना कोणी तरी सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. (छाया : जावेद खान)

०००००

उकाड्यात वाढ

सातारा : अवकाळी पावसानंतर शहर व परिसरात उकाडा पुन्हा वाढला आहे. पावसाने तात्पुरता गारवा निर्माण झाला होता. गारव्याने सातारकर सुखावले असतानाच पुन्हा उकाडा जाणवायला लागला आहे. त्यामुळे दुपारी चटके बसत आहेत.

००००

अपघाताला निमंत्रण

सातारा : मोही, ता. माण येथील शिंगणापूर-म्हसवड मार्गावरील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरील झुडपे काढून वाहनचालकांना होणारा अडथळा हटविण्याची मागणी होत आहे.

००००००

साइडपट्टी खचली

सातारा : नागठाणेपासून तारळे रस्त्यावर रस्त्याची साइडपट्टी खचली आहे. हा रस्ता अरुंद असल्याने समोरून आल्यानंतर कोणी वाहन खाली घ्यायचे यावरून त्यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे साइडपट्टी टाकण्याची मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.

०००

कठडे धोकादायक

सातारा : साताऱ्याहून कासकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे ठासळले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहे. याठिकाणी संरक्षक कठडे बांधण्याची मागणी होत आहे.

००००

रुग्णालयात गर्दी

सातारा : शहरात गेल्या तीन दिवसांपासून पहाटे व रात्री थंडी तर दिवसा उकाडा जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांची शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे.

००००

वाहतुकीच्या नियमांचे चालकांकडून उल्लंघन

वाई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने लावत आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महागणपती घाटावरील जुन्या व नव्या पुलावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे.

०००००

बंदोबस्ताची मागणी

सातारा : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचारी, वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

०००००

सॅनिटायझरचा विसर

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सॅनिटायझरचा वापर केला जात होता. मात्र आता त्याचा सोयीस्करपणे विसर पडायला लागला आहे. बहुतांश दुकानांसमोर केवळ स्टॅण्ड उभे केलेले असते. त्यामुळे सॅनिटायझर मात्र केले जात नाही. यामुळे कोरोनाचा शिरकाव वाढण्याचा धोका आहे.

०००००

रिफ्लेक्टरची मागणी

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक नाही. रिफ्लेक्टर नसल्यामुळे दिवसेंदिवस महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

००००००

अपघातांमध्ये वाढ

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी जागोजागी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक तसेच वाहनचालकांमधून होत आहे.

०००

गवत काढण्यास सुरुवात

सातारा : जावली तालुक्यात डोंगर उतारावरील माळरानात गवत मोठ्या प्रमाणात असते. सध्या हे गवत कापणीच्या कामात शेतकरी मग्न झालेला आहे. गवत कापून याच्या गंजी लावून वर्षभर जनावरांना चारा म्हणून वापरला जातो.

-------

चालकांना फसवतोय दिशादर्शक फलक...!

साताऱ्यातील पोवई नाक्यावर बांधकाम कार्यालयासमोर ग्रेड सेपरटेरच्या बोगद्यातून जात येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला ‘प्रवेशबंदी’चा फलक लावला आहे. पण त्याच्या शेजारूनच सेवा रस्ता गेला आहे. त्याचा वापर करणे आवश्यक असताना चालकांची फलकामुळे फसगत होत आहे. (छाया : जावेद खान)

Web Title: Who will tell .. ‘Alay Corona’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.