टेस्ट घेताना रिक्षा भिंतीला धडकली, आरटीओ कार्यालयातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 19:20 IST2021-03-03T19:18:42+5:302021-03-03T19:20:42+5:30
Rto office Satara Accident- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात टेस्ट घेत असताना रिक्षा भिंतीला धडकल्याने मोटार वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी हे जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास झाला.

टेस्ट घेताना रिक्षा भिंतीला धडकली, आरटीओ कार्यालयातील घटना
ठळक मुद्देटेस्ट घेताना रिक्षा भिंतीला धडकली आरटीओ कार्यालयातील घटना; मोटार वाहन निरीक्षक जखमी
सातारा: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात टेस्ट घेत असताना रिक्षा भिंतीला धडकल्याने मोटार वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी हे जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, मोटार वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी हे रिक्षाची टेस्ट घेत असताना ब्रेक लागला नाही. त्यामुळे जवळच असलेल्या भिंतीला रिक्षा धडकली. यात कुलकर्णी हे जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला आणि मांडीला जखम झाली.
या अपघातानंतर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी तत्काळ घटनासैथळी धाव घेऊन जमखी कुलकर्णी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.