शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

आदर्की परिसरात गहू काढणीची लगबग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीच्या कालव्यातून पाणी आल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली. यामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीच्या कालव्यातून पाणी आल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली. यामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने व काढणी, कापणी, मळणी करण्यापेक्षा हार्वेस्टरच्या साह्याने आदर्की परिसरात गहू काढणी सुरू आहे.

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात ज्वारी, हरभरा, बाजरी, कडधान्य पिके घेतली जात होती. त्यावेळी गव्हाचे क्षेत्र नगण्य होते. त्यावेळी गहू काढणे, बांधणे, मळणी वेळी परत कापणे त्यानंतर मळणे आदी कामे करण्यासाठी वेळ, त्याचबरोबर पैसाही जात असे. डिझेलचे भाव वाढल्याने गव्हाचे पोते मळण्यासाठी २५० रुपये घेतले जातात. त्याबरोबर हार्वेस्टरने गहू मळणीसाठी मजूर कमी लागतात. एकरी गहू मळणीसाठी दोन ते तीन हजार रुपये घेतले जातात. गहू चांगला पक्व व उभा असल्यास गव्हाची नासाडी होत नाही व कुड्या येत नाहीत. तोच ओला व पडलेला असल्यास उत्पादनात घट होऊन गव्हात कुड्या येतात. यावर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिले तर बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होत असल्याचे दिसत आहे. डिझेलचे भाव वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यात पंजाब, हरियाणा येथून हार्वेस्टर मशीन गत दहा वर्षांपूर्वी येत; पण आता स्थानिक शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीन घेतल्या आहेत. त्यामुळे गव्हाची पेरणी मागे-पुढे झाली तरी हार्वेस्टर उपलब्ध होत आहे.

(कोट)

यावर्षी विचित्र हवामान, अवकाळी पावसामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. परंतु, बियाणे, खते, औषधे यांच्या दरात वाढ झाल्यामुळे यावर्षी गव्हाचे पीक फायदेशीर ठरलेले नाही. प्रत्येकवर्षी एकरी सोळा ते सतरा क्विंटल उत्पन्न निघते. मात्र, यावेळी सरासरी दहा ते बारा क्विंटल उत्पन्न निघाले आहे.

- शरदराव भोईटे-इनामदार, हिंगणगाव, ता. फलटण

फोटो आहे.

०७आदर्की

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात हार्वेस्टरच्या साह्याने आदर्की परिसरात गहू काढणी सुरू आहे.