शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात साकारणार सुसज्ज नाट्यगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

कोरेगाव : कोरेगाव शहरात मॅफको कंपनीच्या जागेत सुसज्ज नाट्यगृह उभारले जाणार असून, आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश ...

कोरेगाव : कोरेगाव शहरात मॅफको कंपनीच्या जागेत सुसज्ज नाट्यगृह उभारले जाणार असून, आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य शासनाने त्यासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत शासनाने बुधवारी आदेश काढले आहेत.

आमदार महेश शिंदे युवा मंचचे पदाधिकारी राहुल प्र. बर्गे व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, स्वरराज छोटा गंधर्व यांची जन्मभूमी असलेल्या कोरेगावला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. सुसज्ज नाट्यगृह नसल्याने नाट्यप्रेमींसह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. त्यांना नाट्यगृहाचा प्रस्ताव सादर केला होता.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृह उभारणीस मान्यता दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांच्या स्वाक्षरीने दि. १६ जून २०२१ रोजी अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामध्ये कोरेगावमध्ये नाट्यगृह निर्मितीसाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शासन शंभर टक्के रक्कम देणार असून, नगरपंचायतीला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. या नाट्यगृहामुळे कोरेगावनजीकच्या काळात सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक पावेल, असा विश्‍वास राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला.

(चौकट)

जनतेच्या कल्पनेतून साकारणार नाट्यगृह

जनतेच्या कल्पनेतून हे नाट्यगृह व्हावे, अशी आमदार महेश शिंदे यांची इच्छा आहे. नाट्यगृह कसे असावे, भौतिक सुविधा कोणत्या असाव्यात, त्याची रचना कशी केली गेली पाहिजे, याबाबत साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी सुध्दा सूचना करू शकतात, नाट्यगृहाबाबत सूचना कळवाव्यात, असे आवाहन राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे.