तेल्या भुत्याच्या कावडीचे फलटणमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:06 IST2019-04-15T13:05:12+5:302019-04-15T13:06:18+5:30
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला परंपरागत पद्धतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी जातात.

तेल्या भुत्याच्या कावडींनी सोमवारी सकाळी जिंती येथून फलटणच्या दिशेने प्रस्तान केले. कावडीच्या सोबत असणारे परंपरागत शिंग, तुतारी, डफडी आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
मलटण (सातारा) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला परंपरागत पद्धतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी जातात. या सोहळ्यात मानाची असलेल्या तेल्या भुत्या कावडीचे सोमवारी सकाळी फलटणमध्ये आगमन झाले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत कावडीचे स्वागत करण्यात आले.
तेल्या भुत्याचे वंशज निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली खळद येथून शनिवारी रात्री नऊ वाजता कावडीच्या शाही मिरवणुकीस प्रारंभ झाला. यानंतर भुतोची तेली महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. यानंतर कºहा नदीपात्रात महाआरती झाली. मुंगी घाटातून या सर्व कावडी मंगळवार, दि. १६ एप्रिल रोजी शिंगणापूरला पोहोचतील.
हर हर महादेवचा गजर
तेल्या भुत्याच्या कावडींनी सोमवारी सकाळी जिंती येथून फलटणच्या दिशेने प्रस्तान केले. कावडीच्या सोबत असणारे परंपरागत शिंग, तुतारी, डफडी आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.