शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

बैलगाडीतून वऱ्हाड निघालंय लग्नाला, कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:15 IST

बदलत्या काळानुसार गत तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक बदल लग्न सोहळ्यात झाल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा; पण बदलत्या काळात जुन्या गोष्टी लुप्त झाल्या. मात्र, जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी कोपर्डे हवेली येथे मंगळवारी एका युवतीच्या विवाहात वऱ्हाडासाठी चक्क बैलगाड्या सजविण्यात आल्या. या बैलगाडीतूनच वऱ्हाड लग्न मंडपात पोहोचले.

ठळक मुद्देबैलगाडीतून वऱ्हाड निघालंय लग्नाला, कोपर्डे हवेलीत अनोखा सोहळा वधूसह वऱ्हाडीही सजवलेल्या गाडीतून विवाह मंडपात

कोपर्डे हवेली : बदलत्या काळानुसार गत तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक बदल लग्न सोहळ्यात झाल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा; पण बदलत्या काळात जुन्या गोष्टी लुप्त झाल्या. मात्र, जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी कोपर्डे हवेली येथे मंगळवारी एका युवतीच्या विवाहात वऱ्हाडासाठी चक्क बैलगाड्या सजविण्यात आल्या. या बैलगाडीतूनच वऱ्हाड लग्न मंडपात पोहोचले.पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक वऱ्हाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून वऱ्हाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले. त्यातच गावात बैलांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे. त्यामुळे बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

अशातच मंगळवारी कोपर्डे हवेली येथील कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांची कन्या पल्लवी व विंग येथील महादेव खबाले-पाटील यांचे चिरंजीव प्रमोद यांच्या विवाहासाठी बैलगाड्यांचा वापर करण्यात आला. हा विवाह धुरूंग मळा येथील एका कार्यालयात संपन्न झाला.कोपर्डे हवेली ते धुरूंग मळा हे अंतर दोन किलोमीटर आहे. कोपर्डे गावातून सजवलेल्या बैलगाडीतून वधू आणि वऱ्हाड लग्नस्थळी दाखल झाले. यावेळी बैलांना झुली घालून गळ्यात चाळ घातले होते. शिंगाला शेंब्यासह रंग दिला होता. फुगे, कडब्याच्या पेंड्या, बैलगाडीवरून तट्ट्या घातला होता. या सर्व गोष्टींमुळे चव्हाण परिवाराने जुन्या गोष्टीला नव्याने उजाळा दिल्याने हा विषय कौतुकाचा ठरला.ग्रामस्थांत कुतूहलगत काही वर्षांपासून बेंदूर सणाला बैलाऐवजी शेती अवजार म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक काढून सण साजरा केला जातो. यावर्षी पेरले येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचीच पुनरावृत्ती कोपर्डे हवेली येथे बैलगाडीतून गेलेल्या वऱ्हाडी मंडळींनी केली.नववधूच्या हातात कासरावराला, वधूला लग्नस्थळी घेऊन जाण्यासाठी मोठ-मोठ्या अलिशान गाड्या, घोडे यांचा वापर केला जातो; पण या लग्नामध्ये वधू बैलगाडीतून दाखल झाली. एवढेच नव्हे तर कासरा हातात घेऊन उभी राहिलेली वधू यावेळी कौतुकाचा विषय ठरली.

टॅग्स :marriageलग्नSatara areaसातारा परिसर