शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

चिंता नको; पक्ष एकसंध; आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:00 IST

कराड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ...

कराड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण नेते गेले तरीही कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता पक्षासोबत राहतील, त्यामुळे चिंतेचे कारण नाही, आम्ही लढू आणि जनतेच्या न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे..

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अशोक चव्हाण यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसांपासून सूतोवाच होत होतं.

आज आम्ही बाळासाहेब थोरात आणि इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांशी संपर्क केलेला आहे. उद्या आणि परवा राज्यसभेची उमेदवारी भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. या सर्व परिस्थितीत आम्ही ज्या-ज्या विधिमंडळ सदस्य आणि नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, त्यातील कुणीही जाणार नाही. भाजपकडून मुद्दाम वावड्या उठविल्या जात आहेत. नावं घेतली जात आहेत पण त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये”“काँग्रेस पक्ष हा जनतेमध्ये न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळे घडतंय ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे.भाजपला आज निवडणुकीला सामोर जायचं धाडस नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करून आपल्याला काही संधी मिळते का? हे पहाण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. नेतेमंडळी गेले तरी त्यांना मते देणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा खरं चित्र दिसेल. आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत. असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस