शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक गावांचा पाणीप्रश्न स्वनिधीतून मार्गी !

By admin | Updated: April 24, 2016 23:40 IST

शशिकांत शिंदेंचा उपक्रम : देऊरला टँकरने पाणीपुरवठा सुरू करून पालकत्व दाखविले

वाठार स्टेशन : आमदार आदर्श ग्राम योजनेत पालकत्व स्वीकारलेल्या देऊरकरांना शासन देत असलेले पाणी अपुरे पडत असल्यामुळे या गावाच्या पाण्यासाठी पुढाकार घेत आता कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून १२ हजार लिटर क्षमतेचा १ टँकर सुरू करून खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका पार पाडली आहे.
शासनाच्या टंचाईच्या निकषानुसार माणसी २० लिटर पाणी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे आहे. देऊरची सध्याची लोकसंख्या ४ हजार १२५ एवढी असल्याने गावाला दररोज ८० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे, असे असतानाही शासनाकडून केवळ ४८ हजार लिटर पाणी दिले जात आहे. शासनाचे हे पाणी अपुरे पडत असल्यामुळे देऊरकरांनी आमदार शिंदे यांच्याकडे पाण्यासाठी पाठपुरावा केला. यावर शासनाची वाट न बघता आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून १२ हजार लिटर क्षमतेचा एक टँॅकर आता सुरू केला असून, हा टँकर दररोज १ खेप देऊरकरांना देणार असून, यानंतर तो भागातील बनवडी, अंबवडे (सं) वाघोली, रेवडी, तांबी, कोलवडी व गुजरवाडी या गावांनाही पाणीपुरवठा करणार आहे.
देऊर गावास सध्या सहा दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. गावच्या स्वजलधारा योजनेच्या विहिरीतही अत्यल्प पाणी आहे तर नव्याने वसना नदी पात्रात काढलेल्या विहिरीतील पाणीसाठा ही कमी झाल्याने गावाला पाण्याची मोठीटंचाई जाणवत आहे. गावच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर शासनाकडे पाणी टँकर सुरू करण्याबाबत मागणी केली. यावर शासनाने २४ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरच्या दोन फेऱ्या म्हणजेच ४८ हजार लिटर पाणी सुरू केले आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमातून दररोज १२ हजार लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
या पाणी टॅकरचे विधिवत पूजन देऊर या ठिकाणी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम व राष्ट्रवादी (युवक) चे कोरेगाव तालुकाध्यक्ष निलेश जगदाळे यांच्या हस्ते व देऊरच्या सरपंच निलिमा कदम, उपसरपंच बाळकृष्ण कदम, धनसिंग कदम, जि.प सदस्य राहुल कदम सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गावास स्वतच्या बोअरवेलचे पाणी उपलब्ध केल्यबद्दल अजित कदम यांचा ग् सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)