साताऱ्याच्या पश्चिम भागात पाणीटंचाई; नागरिक संतप्त, रास्ता रोकोचा इशारा

By सचिन काकडे | Published: January 1, 2024 07:20 PM2024-01-01T19:20:59+5:302024-01-01T19:21:54+5:30

सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेकडील रामाचा गोट, मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ हा भाग आठ महिन्यांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहे. प्रशासनाला ...

Water scarcity in western part of Satara, Citizens angry | साताऱ्याच्या पश्चिम भागात पाणीटंचाई; नागरिक संतप्त, रास्ता रोकोचा इशारा

साताऱ्याच्या पश्चिम भागात पाणीटंचाई; नागरिक संतप्त, रास्ता रोकोचा इशारा

सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेकडील रामाचा गोट, मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ हा भाग आठ महिन्यांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ही समस्या संपुष्ठात आलेली नाही. आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास दि. ८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी दिला आहे.

याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रामाचा गोट, मंगळवार तळे, अनंत इंग्लिश स्कूल व व्यंकटपुरा पेठ या भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. आठ महिन्यांपासून येथील नागरिकांना कधी कमी दाबाने तर कधी अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी यासाठी पाणीपुरवठा विभागाला लेखी व तोंडी सूचना केल्या. 

तरीदेखील कोणतेही उपाय करण्यात न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसांत पाणीपुरठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करुन नागरिकांची परवड थांबवावी, अन्यथा दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अनंत इंग्लिश स्कूल चौकात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशाराही अविनाश कदम यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत शाहूपुरी पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे.

Web Title: Water scarcity in western part of Satara, Citizens angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.