शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जललक्ष्मी योजनेतून वाईच्या पश्चिम भागात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:40 PM

पसरणी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील चौदा गावांना शेती पाण्यासाठी वरदायिनी ठरणाºया जललक्ष्मी योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पंचवीस किलोमीटर अंतर ...

ठळक मुद्देचौदा गावांना लाभ : पाणी शिवारात आल्याने शेतकरी कामात व्यस्त शेतकऱ्यांकडून पाणी वाटपाचे वेळापत्रक

पसरणी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील चौदा गावांना शेती पाण्यासाठी वरदायिनी ठरणाºया जललक्ष्मी योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पंचवीस किलोमीटर अंतर पार करत रब्बी हंगामातील पिकांना पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी रात्रंदिवस कष्ट घेऊन पिकांना पाणी देण्याच्या कामात व्यस्त आहेत.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमत: धोम व नंतर बलकवडी अशा दोन धरणांची निर्मिती झाली. गेली पन्नास वर्षे राज्यातील हजारो एकर जमिनीला व दुष्काळी भागात या धरणामुळे पाणी पोहोचले; मात्र ज्या तालुक्यातील जनतेने धरणासाठी आपल्या जमीन घरेदारे यांचा त्याग करून आपले सर्वस्व दुसºयासाठी दिले त्या तालुक्यातील शेतीपाण्याचा प्रश्न आजही संपला नाही. धोम धरण निर्मितीवेळी धरणग्रस्त व उर्वरित गावांना सहा टक्के पाणी साठा राखून ठेवला आहे. त्यातच व्याहळी, एकसर, कुसगाव, पसरणी व वाई ग्रामीण भाग शेती पाण्यापासून वंचित होता. जललक्ष्मी योजनेत याही भागाचा समावेश कित्येक वर्षांच्या शेतकºयांच्या लढ्यामुळे झाला. या शेती पाण्यासाठी पन्नास वर्षे शेतकरी वाट बघत होते.

गेल्या काही वर्षांत जललक्ष्मी योजनेचे काम पूर्ण झाले असून, बलकवडी धरणातून ग्रॅव्हिटीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे वयगाव, दह्याट, बोरगाव, धावली, मालतपूर, चिखली, मुगाव, दसवडी, न्हाळेवाडी, बोरीव, व्याहळी, एकसर, कुसगाव, पसरणी व वाईचा भाग ओलिताखाली येत आहे. काही दिवसांपूर्वी या पश्चिम भागातील गावांच्या शेतकºयांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यात पाणी वाटपाचे निर्णय व वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शेतीला पाणी देण्याचे काम सुरू आहे.

या योजनेमुळे धरण निर्मितीपासून शेती पाण्यापासून वंचित असणाºया चौदा गावांच्या शेतीला पाणीपुरवठा होत आहे. या योजनेच्या पाईपलाईनची गळती काढण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासकीय विभागाने त्वरित करावी, ही मागणी पश्चिम भागातील सर्व गावातील शेतकºयांची आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळाल्याने उत्पन्न वाढून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटणार आहे. 

 धोम धरण निर्मितीवेळी पश्चिम भागाला सहा टक्के पाणी राखून ठेवण्यात आले. मात्र उर्वरित वंचित भागाला शेती पाण्यासाठी या योजनेचा फायदा होणार असून, त्यासाठी अजून अधिक पाणीसाठा देण्यासाठी सर्व शेतकºयांच्या वतीने मागणी करणार आहोत.-दिलीप वाडकर, अध्यक्ष जललक्ष्मी पाणीपुरवठा योजनाजललक्ष्मी शेती पाणी योजनेच्या लाभार्थी सर्व गावांतील शेतकºयांनी आपल्या भिजणाºया शेतीच्या क्षेत्राची मागणी अर्ज तत्काळ भरून द्यावेत, पाईपलाईन गळतीचे काम संबंधित विभागाकडून काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. -मकरंद पाटील, आमदारजललक्ष्मी योजनेचा पाण्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला शेतीला पाणी मिळाल्याने आमचे उत्पन्न वाढून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटला आहे.-आनंदराव हगवणे,  शेतकरी कुसगाव, वाई

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी