शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

चिमुकली पाहतेय वाट; आई-बाबा कोरोना लढ्यात; घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागतय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:37 AM

आजीबरोबर पूर्वा गावी गेली. हे दाम्पत्य आपले ह्यकर्तव्यह्ण बजावू लागले. ड्यूटीवरून घरी आले की पूर्वाच्या आठवणीने व्याकूळ झालेले हे दाम्पत्य व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी बोलते. त्यावेळी ती आई... बाबा... म्हणून हाका मारते आणि या दोघांतील खाकी वर्दीतील अधिकारी गायब होऊन त्यांच्यातील आई, बाबा जागा होतो. त्यावेळी दोघेही भावनिक होतात.

ठळक मुद्देआरोग्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र प्रयत्न करणा-या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:चे घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागत आहे

अजय जाधव ।उंब्रज : ती दीड वर्षांची चिमुकली. आई व वडील दोघेही मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून ते दोघेही ड्यूटीवर. एकीकडे ह्यकर्तव्यह्ण आणि दुसऱ्या बाजूला लेकीची माया व प्रेम. अशा द्विधा अवस्थेत या खाकी वर्दीतील दाम्पत्याने कर्तव्याला प्राधान्य दिले. स्वत:च्या मुलीला तिच्या आजीकडे सोडून हे दाम्पत्य सध्या कोरोना लढ्यात कार्यरत आहे.

क-हाड तालुक्यातील वाठार येथील सारिका देसाई यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न शिराळा तालुक्यातील ढोलेवाडीमधील पोलीस उपनिरीक्षक महेश नायकवडी यांच्याबरोबर झाले. दोघेही मुंबई पोलीस दलात सेवेत आहेत. सारिका या धारावी पोलीस ठाण्यात तर महेश हे डोंबिवली पोलीस ठाण्यात. या दाम्पत्याला दीड वर्षाची पूर्वा ही कन्या. दोघांची पोलीस ठाणे वेगवेगळी.

घरी पूर्वा आजीबरोबर राहत होती. ड्यूटीवरून हे दोघे घरी आले की पूर्वा दोघांना सोडत नव्हती. दीड वर्षाच्या लेकीचा लळा लागल्यामुळे दोघेही ड्यूटी कधी संपते, घरी जावुन तिला कधी भेटतोय, याची वाट पाहायचे. असे असतानाच कोरोनाचे संकट आले. या दाम्पत्याला दीड वर्षाच्या लेकीला गावी पाठवण्याचा निर्णय काळजावर दगड ठेवून घेण्याची वेळ आली.

आजीबरोबर पूर्वा गावी गेली. हे दाम्पत्य आपले ह्यकर्तव्यह्ण बजावू लागले. ड्यूटीवरून घरी आले की पूर्वाच्या आठवणीने व्याकूळ झालेले हे दाम्पत्य व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी बोलते. त्यावेळी ती आई... बाबा... म्हणून हाका मारते आणि या दोघांतील खाकी वर्दीतील अधिकारी गायब होऊन त्यांच्यातील आई, बाबा जागा होतो. त्यावेळी दोघेही भावनिक होतात. आई-बाबाला पाहून ती चिमुकली फोनवर त्यांना बिलगण्याचा प्रयत्न करू लागली की, या दोघांच्या भावना अनावर होतात. लेकीने आई बाबांचा जोसरा काढला तर..? ती आजारी पडली तर..? हे प्रश्न त्यांना सतावू लागले. यामुळे हल्ली हे दोघेही तिच्याबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलणेही टाळू लागले आहेत.त्यांचं दु:ख समजून घ्या!या पोलीस अधिकारी दाम्पत्यासारखे कित्तेक अधिकारी, कर्मचारी आपल्या मुलांपासून लांब राहून कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी स्वत:ला झोकून देत आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांना वेळप्रसंगी कठोर पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात चिडचिड होत आहे. त्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र प्रयत्न करणा-या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:चे घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागत आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiri City Police Thaneरत्नागिरी शहर पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी