शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सातारा : कृष्णा नदीपात्रात मगरीचा वावर, खडकी परिसरात दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:36 PM

खडकी, ता. वाई गावच्या नदीपात्राबरोबरच लगतच्या शिवारात मोठी मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत संपर्क साधल्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी फक्त पाहणी केली. त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाने गांधारीची भूमिका घेतल्याची चर्चा कृष्णा नदीकाठच्या गावांंमध्ये सुरू आहे.

ठळक मुद्दे कृष्णा नदीपात्रात मगरीचा वावर, खडकी परिसरात दर्शन वनविभागाकडून फक्त पाहणी; ग्रामस्थ, शेतकरी भयभीत

पाचवड : खडकी, ता. वाई गावच्या नदीपात्राबरोबरच लगतच्या शिवारात मोठी मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत संपर्क साधल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी केली. त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाने गांधारीची भूमिका घेतल्याची चर्चा कृष्णा नदीकाठच्या गावांंमध्ये सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या मगरींचा वावर वाढला आहे. गतवर्षी कृष्णा नदीकाठच्या अनेक गावांमधील नदीपात्रात मगरींचा वावर असतानाही वनविभागाने कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नव्हती.

दोन वर्षापूर्वी तर चिंधवली गावातील एका शेतकऱ्यांवर मोठ्या मगरीने हल्ला केला होता. यामध्ये संबंधित शेतकरी गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे यावर्षी नदीपात्रात वाढलेला मगरींचा वावर व त्यावर वनविभागाकडून होत नसलेली उपाययोजना यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी अत्यंत भयभीत झाले आहेत.या मगरींपासून लहान मुले, महिला, शेतकरी यांच्याबरोबरच नदीपात्रावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी कृष्णा नदीपात्रालगतच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवSatara areaसातारा परिसर