सातारा : कृष्णा नदीपात्रात मगरीचा वावर, खडकी परिसरात दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:39 IST2018-10-16T13:36:29+5:302018-10-16T13:39:30+5:30
खडकी, ता. वाई गावच्या नदीपात्राबरोबरच लगतच्या शिवारात मोठी मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत संपर्क साधल्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी फक्त पाहणी केली. त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाने गांधारीची भूमिका घेतल्याची चर्चा कृष्णा नदीकाठच्या गावांंमध्ये सुरू आहे.

सातारा : कृष्णा नदीपात्रात मगरीचा वावर, खडकी परिसरात दर्शन
पाचवड : खडकी, ता. वाई गावच्या नदीपात्राबरोबरच लगतच्या शिवारात मोठी मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत संपर्क साधल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पाहणी केली. त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाने गांधारीची भूमिका घेतल्याची चर्चा कृष्णा नदीकाठच्या गावांंमध्ये सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या मगरींचा वावर वाढला आहे. गतवर्षी कृष्णा नदीकाठच्या अनेक गावांमधील नदीपात्रात मगरींचा वावर असतानाही वनविभागाने कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नव्हती.
दोन वर्षापूर्वी तर चिंधवली गावातील एका शेतकऱ्यांवर मोठ्या मगरीने हल्ला केला होता. यामध्ये संबंधित शेतकरी गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे यावर्षी नदीपात्रात वाढलेला मगरींचा वावर व त्यावर वनविभागाकडून होत नसलेली उपाययोजना यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी अत्यंत भयभीत झाले आहेत.
या मगरींपासून लहान मुले, महिला, शेतकरी यांच्याबरोबरच नदीपात्रावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी कृष्णा नदीपात्रालगतच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.