शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

‘काकस्पर्श’ होईना... गावावर चक्क कावळा रुसलाय! कावकाव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 19:00 IST

satara : गावांतील स्मशानभूमीकडे गेल्या कित्येक वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय.

- संजय पाटील

कऱ्हाड : पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना नैवेद्य दिला जातोय. बहुतांश गावांत या नैवेद्याला ‘काकस्पर्श’ही होतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडीसह अन्य काही गावांचं दुखणं वेगळंच आहे. या गावांतील स्मशानभूमीकडे गेल्या कित्येक वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय.

जखिणवाडी गावात हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांत एकही ‘ठाव’ कावळ्याने शिवला नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. नदीकाठावर गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही, हीच सल ग्रामस्थांच्या मनात आहे. कावळा दृष्टीस पडणे दूरच; पण दूरवरून त्याची ‘कावकाव’ही ऐकायला येत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. कावळे गावावर रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे निर्माण झालीय. कावळ्यांना खूश करण्यासाठी अंधश्रद्धेतून येथे अनेक मार्ग काढले जातायत. वेगवेगळे विधी केले जातायत; पण परिस्थिती बदलत नाही, असे येथील ग्रामस्थ म्हणतात.

चचेगावातही हीच स्थिती आहे. कावळे रुसल्याचा समज करून घेऊन ग्रामस्थ ‘उपाय’ शोधण्याच्या मार्गावर आहेत. ‘काही वर्षांपूर्वी अंत्यविधीचा नैवेद्य शिवायला एकतरी कावळा यायचा; पण सध्या स्मशानभूमीत एकही कावळा दिसत नाही. अंत्यविधीवेळी कावळ्याची वाट पाहणंच आता आम्ही सोडून दिलंय, असं तेथील ग्रामस्थ सांगतात. नारायणवाडीतही ग्रामस्थ आता कावळ्याची वाट पाहत नाहीत. वाट पाहणं व्यर्थ ठरतंय, असं तेथील ग्रामस्थांचंही मत आहे.

दीड वर्ष स्मशानभुमीत नैवेद्यजखिणवाडीच्या ग्रामस्थांनी कावळ्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेत. स्मशानभुमीत दररोज नैवेद्य ठेवावा, असे एकदा सांगण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी सलग दीड वर्ष दररोज स्मशानभुमीत गोडाचा नैवेद्य ठेवला. दररोज एका घरातून हा नैवेद्य जायचा. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. एकही नैवेद्य कावळ्याने शिवला नाही.

सर्वभक्षी असूनही कावळा गायब!कावळा सर्वभक्षीय आहे. त्यामुळे भक्ष्य उपलब्ध नसल्याने त्याची संख्या घटली, असे म्हणणे उचित ठरणार नाही. ‘स्वच्छतादूत’ म्हणून हा पक्षी परिचित आहे. पिकांवरील किटकनाशकांच्या वापरामुळे कावळ्यांवर दुष्परिणाम झाला असल्याने त्यांची संख्या घटल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे; पण हेच मूळ कारण आहे का, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान पक्षी तज्ज्ञांसमोर आहे.

खाद्य आणि सुरक्षितता असेल त्याठिकाणी कावळा हमखास असतो. तो सर्वभक्षी आहे. शिवारात मोठ्या प्रमाणावर खाद्य असेल तर कावळे स्मशानभुमीकडे फिरकत नसावेत. किंवा स्मशानभुमी परिसरात त्यांना सुरक्षितता वाटत नसावी.- सुधीर कुंभार, संचालकएम. एन. रॉय पर्यावरण संस्था

जखिणवाडी गावावर कावळ्यांचा रूसवा आहे. आजपर्यंत याबाबत आम्ही अनेकांचे मार्गदर्शन घेतले आहे. गावची स्मशानभुमी गर्द झाडीत आहे. मात्र, या झाडीत एकही कावळा येत नाही. याचे कारण अद्याप आम्हाला समजलेले नाही. अनेक वर्षापासून ही परिस्थिती आहे.- रामदादा पाटीलग्रामस्थ, जखिणवाडी

डोमकावळा अन् गावकावळा१) कावळा हा पक्षी वर्गाच्या ‘काक’ कुलातील पक्षी आहे.२) ‘गावकावळा’ व ‘डोमकावळा’ असे त्याचे दोन प्रकार आहेत.३) गावकावळ्याच्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते.४) मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो.५) डोमकावळ्याची चोच धारदार आणि बळकट असते. तसेच चकचकित काळाभोर रंग असतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSatara areaसातारा परिसर