कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुपने गावामध्ये रुग्णसंख्या अचानक वाढली, तसेच काही बाधितांचा मृत्यूही झाला. त्यामुळे गावात धास्ती निर्माण झाली. मात्र, याही परिस्थितीत गावाने एकी दाखवीत रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मदत गोळा करण्यास सुरुवात केली. आजअखेर दोन लाखांवर रक्कम त्यासाठी जमा झाली आहे. त्यातच हिंदू एकता आंदोलनचे पाटण तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांनी स्वत: एक मशीन गावासाठी दिले आहे, तर ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे संचालक प्रवीण निवासराव पाटील यांनीही वडील दिवंगत निवासराव ज्ञानू पाटील यांच्या स्मरणार्थ गावातील कोरोनो रुग्णांच्या सेवेसाठी दोन मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर, रेग्युलेटर, ऑक्सिजन मास्क, स्पिंडल की, फ्लो मीटर आदी साहित्य दिले.
जिल्ह्याचे अन्न, औषध निरीक्षक अरुण गोडसे यांच्या हस्ते हे साहित्य सरपंच अशोक झिंब्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी गणेश माळी, हिंदू एकता आंदोलनचे पाटण तालुकाध्यक्ष गणेश पाटील, अमृत पाटील, सुहास पाटील, प्रशांत पाटील, पंकज पाटील, शंकर घोलप, शिवाजी पाटील, धनाजी पाटील, अजित पाटील, रोहित पाटील, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : ११केआरडी०१
कॅप्शन : सुपने, ता. कऱ्हाड येथे कोरोना रुग्णांसाठीचे साहित्य अन्न, औषध निरीक्षक अरुण गोडसे यांच्या हस्ते सरपंच अशोक झिंब्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रवीण पाटील, गणेश पाटील, अमृत पाटील आदी उपस्थित होते.